३ जूनचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३ जून चे दिनविशेष.

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ३ जूनचा इतिहास पहा.
![]() |
३ जूनचा इतिहास, बाबूराव पेंटर (Baburao Painter) छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह. |
बाबूराव पेंटर - (३ जून १८९० - १६ जानेवारी १९५४) बाबूराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
शेवटचा बदल ३ जून २०२४
जागतिक दिवस / दिनविशेष
३ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- विश्व सायकल दिवस.
३ जूनचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)
३ जूनचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी- ३५०: ज्युलियस नेपोटियानस / नेपोटियन यांनी रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.
- १५३९: एर्नान्दो दि सोतो यांनी फ्लोरिडा हा स्पेनचाच भाग असल्याचे जाहीर केले.
- १८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवा बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.
- १८८९: कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.
- १९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
- १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
- १९४३: झूट सुट दंगे - लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्या लोकांना बडवून काढले.
- १९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
- १९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
- १९६९: व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रॅंक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
- १९७९: मेक्सिकोच्या अखातात इहटॉक १ या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
- १९८४: ऑपरेशन ब्ल्यु स्टार - भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
- १९९१: जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
- १९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
- २००६: सर्बिया आणि मॉंटेनिग्रोचे विघटन. मॉंटेनिग्रोला स्वातंत्र्य.
जन्म (वाढदिवस, जयंती)
३ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८६५: जॉर्ज पाचवे (इंग्लंडचे राजे, मृत्यू: २० जानेवारी १९३६).
- १८९०: बाबूराव पेंटर (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रकार, मृत्यू: १६ जानेवारी १९५४).
- १८९२: आनंदीबाई शिर्के (लेखिका तसेच बालसाहित्यिका, मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८६).
- १८९५: के.एम. पण्णीक्कर (चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, मृत्यू: १० डिसेंबर १९६३).
- १९२४: एम. करुणानिधी (तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री, मृत्यू: ७ ऑगस्ट २०१८).
- १९३०: जॉर्ज फर्नांडिस (भारतीय पत्रकार आणि राजकारणी, मृत्यू: २९ जानेवारी २०१९).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
३ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १६५७: विल्यम हार्वी (मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ, जन्म: १ एप्रिल १५७८).
- १९३२: सर दोराबजी टाटा (उद्योगपती, जन्म: २७ ऑगस्ट १८५९).
- १९५६: वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी (स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार, जन्म: १८ मार्च १८८१).
- १९८९: रुहोलह खोमेनी (इराणी धर्मगुरू आणि राजकारणी, जन्म: २४ सप्टेंबर १९०२).
- १९९०: रॉबर्ट नोयिस (इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक, जन्म: १२ डिसेंबर १९२७).
- १९९७: मीनाक्षी शिरोडकर (भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री, जन्म: ११ ऑक्टोबर १९१६).
- १९७७: आर्चिबाल्ड विवियन हिल (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ, जन्म: २६ सप्टेंबर १८८६).
- २०१०: अजय सरपोतदार (मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक, जन्म: १६ ऑक्टोबर १९५९).
- २०१३: अतुल चिटणीस (जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार, जन्म: २० फेब्रुवारी १९६२).
- २०१४: गोपीनाथ मुंडे (भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री, जन्म: १२ डिसेंबर १९४९).
- २०१६: मुहम्मद अली (अमेरिकन बॉक्सर, जन्म: १७ जानेवारी १९४२).
३ जूनचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:
जून महिन्याचा इतिहास | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व इतिहास पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / जून महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय