३० जून दिनविशेष

३० जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० जून चे दिनविशेष.
३० जून दिनविशेष | 30 June in History
३० जून दिनविशेष, दादाभाई नौरोजी. छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
दादाभाई नौरोजी - (४ सप्टेंबर १८२५ - ३० जून १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनाकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.

जागतिक दिवस

३० जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • स्वातंत्र्य दिन: कॉँगो.

ठळक घटना (घडामोडी)

३० जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
 • १७५८: डॉमस्टाटलची लढाई.
 • १८०५: मिशिगनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
 • १९०५: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
 • १९०८: तुंगस्का स्फोट.
 • १९३४: ऍडोल्फ हिटलरने आपल्या राजकीय प्रतीस्पर्ध्यांना तुरुंगात टाकले वा ठार मारले.
 • १९३६: गॉन विथ द विंड ही कादंबरी प्रकाशित.
 • १९५६: युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८ हे डी.सी.७ प्रकारचे व ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यात ग्रँड कॅन्यन वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
 • १९६०: कॉँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य.
 • १९७१: सोवियेत संघाच्या सोयुझ ११ अंतराळयानास अपघात. ३ अंतराळवीर मृत्युमुखी.
 • १९७८: अमेरिकेच्या संविधानातील २६वा बदल संमत. मतदानाचे वय १८ वर्षे.
 • १९९७: हाँग काँग चीनच्या आधिपत्याखाली.
 • २००२: ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
 • २००५: स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मुभा.

जन्म (वाढदिवस, जयंती)

३० जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १४७०: चार्ल्स आठवा, फ्रांसचा राजा.
 • १९३३: माईक स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४१: पीटर पॉलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५४: पिएर चार्ल्स, डॉमिनिकाचा पंतप्रधान.
 • १९६६: माईक टायसन, अमेरिकन मुष्टियोद्धा.
 • १९६९: सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७३: दोड्डा गणेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

३० जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जून महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.