९ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ९ जून चे दिनविशेष.
दिनांक ९ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल ९ जून २०२१
जागतिक दिवस
९ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
९ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ६८: रोमन सम्राट नीरो यांनी आत्महत्या केली.
- १६६५: ‘मिर्झा राजा जयसिंह’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्यात पुरंदरचा तह झाला.
- १६९६: ‘छत्रपती राजाराम’ आणि ‘महाराणी ताराबाई’ यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवण्यात आले.
- १७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
- १७३२: जेम्स ओगलथॉर्पला अमेरिकेत जॉर्जिया येथे वसाहत करण्याची मुभा मिळाली.
- १८५६: ५०० मॉर्मोन पंथीयांनी पंथीयांनी आपला धर्म अनिर्बंध पाळण्यासाठी आयोवा सिटी येथून सॉल्ट लेक सिटीकरता प्रस्थान केले.
- १८६३: अमेरिकन यादवी युद्ध - ब्रॅन्डी स्टेशनची लढाई.
- १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.
- १९०६: विनायक सावरकर यांचे लंडनला प्रयाण.
- १९२३: बल्गेरियात लश्करी उठाव.
- १९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्या रॉकेटचे पेटंट मिळाले.
- १९३४: डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.
- १९३५: चीनने ईशान्य चीन मधील जपानची घुसखोरी मान्य केली.
- १९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
- १९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
- १९६४: भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.
- १९७०: अॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
- १९७४: सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
- १९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
- १९७८: मॉर्मोन चर्चने श्यामवर्णीय पुरूषांना पादरी होण्याची परवानगी दिली.
- १९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
- २००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
- २००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
- २००६: २००६ फिफा विश्वचषक जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू.
- २००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
९ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६७२: पीटर पहिला (रशियाचे झार, मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५).
- १९१२: वसंत देसाई (संगीतकार, मृत्यू: २२ डिसेंबर १९७५).
- १९३१: नंदिनी सत्पथी (भारतीय लेखक व राजकारणी, मृत्यू: ४ ऑगस्ट २००६).
- १९४९: किरण बेदी (सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी).
- १९७७: अमिषा पटेल (भारतीय अभिनेत्री).
- १९८१: अनुष्का शंकर (इंग्रजी-भारतीय सतार वादक आणि संगीतकार).
- १९८५: सोनम कपूर (भारतीय अभिनेत्री).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
९ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ६८: नीरो (रोमन सम्राट, जन्म: १५ डिसेंबर ३७).
- १७१६: बंदा सिंग बहादूर (शिख सेनापती, जन्म: १६ ऑक्टोबर १६७०).
- १८३४: पं. विल्यम केरी (अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक, जन्म: १७ ऑगस्ट १७६१).
- १८७०: चार्ल्स डिकन्स (इंग्रजी कादंबरीकार व लेखक, जन्म: ७ फेब्रुवारी १८१२).
- १९००: बिरसा मुंडा (आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, जन्म: १५ नोव्हेंबर १८७५).
- १९४६: आनंद महिडोल तथा राम, सातवे (थायलँडचे राजे, जन्म: २० सप्टेंबर १९२५).
- १९८८: विवेक ऊर्फ गणेश भास्कर अभ्यंकर (भारतीय अभिनेते, जन्म: २३ फेब्रुवारी १९१८).
- १९९३: सत्येन बोस (बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, जन्म: २२ जानेवारी १९१६).
- १९९५: प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा (स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते, जन्म: ७ नोव्हेंबर १९००).
- २०११: मकबूल फिदा हुसेन (चित्रकार व दिग्दर्शक, जन्म: १७ सप्टेंबर १९१५).
९ जून दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जून महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय