१३ जून दिनविशेष

१३ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १३ जून चे दिनविशेष.
१३ जून दिनविशेष | 13 June in History

दिनांक १३ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


विनायक पांडुरंग करमरकर - (२ ऑक्टोबर १८९१ - १३ जून १९६७) विनायक पांडुरंग करमरकर / नानासाहेब करमरकर, हे प्रसिद्ध शिल्पकार होते. मुंबईच्या ‘सर जे. जी. कला विद्यालय’ येथे ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने करमरकरांना १९६२ साली ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन गौरवले.

शेवटचा बदल १२ जून २०२१

जागतिक दिवस
१३ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१३ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १५२५: कॅथोलिक धर्मगुरू व नननी घेतलेले ब्रह्मचर्याचे व्रत मोडून मार्टिन ल्युथर व कॅथेरिना फॉन बोराने लग्न केले.
 • १७७७: अमेरिकन क्रांती - अमेरिकेच्या सैन्याला तालीम देण्यासाठी मार्किस दि लाफियेत दक्षिण कॅरोलिनामध्ये आला.
 • १८७१: कॅनडाच्या लाब्राडोर प्रांतात हरिकेन. ३०० ठार.
 • १८८१: यु.एस.एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
 • १८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.
 • १८९८: युकॉन प्रांताची रचना.
 • १९१७: पहिले महायुद्ध - जर्मनीच्या गॉथा जी विमानांची लंडनवर बॉम्बफेक. ४६ बालकांसह १६२ ठार, ४३२ जखमी.
 • १९३४: व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट. यानंतर मुसोलिनीने हिटलरचे वर्णन छोटेसे बावळट माकड असे केले.
 • १९४२: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने युद्ध माहिती खाते सुरू केले.
 • १९५२: सोवियेत संघाच्या मिग-१५ विमानाने स्वीडनचे डी.सी. ३ प्रकारचे प्रवासी विमान पाडले.
 • १९५६: पहिली युरोपियन चॅंपियन्स कप स्पर्धा रेआल माद्रिदने जिंकली.
 • १९६६: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मिरांडा वि. अ‍ॅरिझोना खटल्यात निकाल दिला की पोलिसांनी संशयिताला पकडताना त्याच्या हक्कांची जाणीव करून दिलीच पाहिजे.
 • १९७८: इस्रायेलची लेबेनॉनमधून माघार.
 • १९८२: सौदी अरेबियाचे राजे खालिद यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ फह्द राजेपदी.
 • १९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
 • १९९४: अलास्कातील ज्युरीने एक्झॉन व कॅप्टन जोसेफ हेझेलवूडना एक्झॉन वाल्देझ तेल गळती बद्दल दोषी ठरवले व १५ अब्ज डॉलर दंड ठोठावला.
 • १९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
 • २०००: पोप जॉन पॉल दुसर्‍यावर खूनी हल्ला करणार्‍या महमत अली आग्काला इटलीने माफ केले.
 • २०००: स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी बारा लढतीत विजय मिळविला.

जन्म / वाढदिवस / जयंती
१३ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८३१: जेम्स क्लार्क मॅक्सवेल (ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ, मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९).
 • १८७९: गणेश दामोदर / बाबाराव सावरकर (भारतीय स्वातंत्र्यसैनिक. मराठी व्यक्ती, मृत्यू: १६ मार्च १९४५).
 • १९०५: कुमार श्री दुलीपसिंहजी (इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते, मृत्यू: ५ डिसेंबर १९५९).
 • १९०९: इ. एम. एस. नंबुद्रीपाद (केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, मृत्यू: १९ मार्च १९९८).
 • १९२३: प्रेम धवन (गीतकार, पद्मश्री पुरस्कर्ते, मृत्यू: ७ मे २००१).
 • १९६५: मनिंदर सिंग (भारतीय क्रिकेटपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१३ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वेसंपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जून महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.