७ मे दिनविशेष

७ मे दिनविशेष - [7 May in History] दिनांक ७ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
रविंद्रनाथ टागोर | Rabindranath Tagore

दिनांक ७ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


रविंद्रनाथ टागोर - (७ मे १८६१ - ७ ऑगस्ट १९४१)

शेवटचा बदल ८ मे २०२१

जागतिक दिवस
 • रेडियो दिन: रशिया.
 • एड्समुळे अनाथ झालेल्यांचा जागतिक दिवस.

ठळक घटना / घडामोडी
 • १८४९: स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ‘कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ‘बेथुन कॉलेज’ मध्ये रूपांतर झाले आहे.
 • १८७८: पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन (आताचे साहित्य संमेलन) भरविण्यात आले.
 • १८९५: अलेक्झांडर पोपॉफने प्राथमिक रेडिओ रिसीव्हर वापरून रेडिओ संदेशवहनाचा प्रयोग यशस्वी केला.
 • १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
 • १९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.
 • १९५२: जेफ्री डमर याने आधुनिक संगणनाचा आधार असलेल्या 'इंटिग्रेटेड सर्किट्स'ची संकल्पना प्रकाशित केली.
 • १९५४ - १९५५: सर्व विषयांसाठी मराठी माध्यम आणण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या विधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
 • १९५५: एअर इंडियाची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
 • १९७३: अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरचा पायाभरणी समारंभ.
 • १९७६: होंडा एकॉर्डा ही गाडी प्रकाशित करण्यात आली.
 • १९७८: एव्हरेस्टची पहिली ऑक्सिजनरहित मोहीम यशस्वी.
 • १९८० : जागतिक आरोग्य संघटनेने देवी रोगाचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले.
 • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
 • १९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
 • १९९४: नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
 • २०००: व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
 • २०००: कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

जन्म / वाढदिवस
 • १८६१: रविंद्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक.
 • १८८०: डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्‍न.
 • १९०९: एडविन लॅंड, अमेरिकन संशोधक.
 • १९०९: एडविन एच. भूमी, पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक.
 • १९१२: पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.
 • १९२३: आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.
 • १९३२: राज मोहन वोहरा, शौर्य आणि नेतृत्त्वाबद्दल महावीर चक्र आणि परम विशिष्ठ सेवा पद सन्मानित लेफ्टनंट जनरल.
 • १९४८: नित्यानंद हळदीपूर, मैहर घराण्याचे बासरी वादक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९२४: अल्लुरी सीताराम राजू, आदिवासींना जंगलात जाण्याचा हक्क मिळण्यासाठी लढणारा क्रांतिकारक.
 • १९८६: शिवाजीराव पटवर्धन, समाजसुधारक.
 • १९९१: मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू, लोककवी.
 • १९९४: उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर, ध्रुपद गायक.
 • २००१: मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर, लेखिका.
 • २००१: प्रेम धवन, गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
 • २००२: दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
 • २०२०: मालविका मराठे, (१९९१ - २००१ या काळातल्या त्या दूरदर्शन या दूरचित्रवाणी प्रसारक संस्था-सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका.)

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.