दिनांक ११ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
साल्वादोर दाली - (११ मे १९०४ - २३ जानेवारी १९८९).
शेवटचा बदल १० मे २०२१
जागतिक दिवस
- तंत्रज्ञान दिन: भारत.
ठळक घटना / घडामोडी
- १५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
- १८५७: पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम - स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
- १८८८: ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
- १९१०: अमेरिकन कॉंग्रेसने ग्लेशियर राष्ट्रीय उद्यानची रचना केली.
- १९२७: चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
- १९४९: सयामचे थायलंड असे नामकरण.
- १९४९: इस्रायेलला संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- १९८७: अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरात सर्वप्रथम हृदय व फुप्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
- १९८७: गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- १९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
- १९९८: भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.
- २००१: विजेवर चालणारी पहिली भारतीय मोटार 'रेवा'चे उद्घाटन.
जन्म / वाढदिवस
- १८९५: जिद्दू कृष्णमूर्ति (जे कृष्णमूर्ति), भारतीय दार्शनिक.
- १९०४: साल्वादोर दाली, स्पॅनिश चित्रकार.
- १९१४: ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
- १९१८: रिचर्ड फाइनमन, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
- १९४६: रॉबर्ट जार्विक, कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट.
- १९५०: सदाशिव अमरापूरकर, मराठी आणि हिंदी नाट्य आणि चित्रपट अभिनेता. (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१४)
- १९७२: जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
- १८७१: जॉन हर्षल, इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- १९८१: बॉब मार्ली, जमैकाचा संगीतकार.
- १८८९: जॉन कॅडबरी, कॅडबरी कंपनी चे संस्थापक.
- १९९३: शाहू मोडक, अभिनेते.
- २००१: डग्लस अॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.
- २००४: कृष्णदेव मुळगुंद, चित्रकार व नृत्यदिग्दर्शक.
- २००९: सरदारिलाल माथादास नंदा, भारतीय नौसेनाधिपती.
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |