१३ मे दिनविशेष

१३ मे दिनविशेष - [13 May in History] दिनांक १३ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
संदीप खरे | Sandeep Khare

दिनांक १३ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


संदीप खरे - (१३ मे १९७३) मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी असलेले संदिप खरे ईयत्ता चौथी पासूनच कवीता करत आहेत. सलिल कुलकर्णींसोबत केलेले ‘आयुष्यावार बोलू काही’ आणि ‘दिवस असे की’ हे त्यांच्या गीतसंग्रहावर आधारित कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

शेवटचा बदल १२ मे २०२१

जागतिक दिवस
१३ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • राष्ट्रीय एकता दिन.

ठळक घटना / घडामोडी
१३ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी मेन्लो पार्क न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
 • १९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.
 • १९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला शर्यत सिल्व्हरस्टोन येथे झाली.
 • १९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
 • १९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्‍न पुरस्कार देण्यात आला.
 • १९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
 • १९७०: गायिका, नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी बिर्ला मातोश्री सभागृहात सतत ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विक्रम केला.
 • १९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला गिर्यारोहक बनली.
 • १९९६: अरुण खोपकर दिग्दर्शित ‘सोच समझके’ या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या निर्मितीला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
 • १९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
 • १९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची यशस्वी तपासणी पोखरण येथे केली.
 • २०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तरांचल(उत्तराखंड), झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 • २०००: भारताच्या प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता यांनी विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

जन्म / वाढदिवस / जयंती
१३ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८५७: सर रोनाल्ड रॉस (हिवतापाच्या जंतुंचा शोध लावणारे, नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर).
 • १९०५: फक्रुद्दीन अली अहमद (भारताचे पाचवे राष्ट्रपती).
 • १९१६: सच्चिदानंद राऊत (भारतीय ओरिया भाषेचे कवी).
 • १९१८: तंजोर बालसरस्वती (भरतनाट्यम नर्तिका).
 • १९२५: डॉ. भालचंद्र दिनकर फडके (दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक).
 • १९५१: आनंद मोडक (भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक).
 • १९५६: श्री श्री रविशंकर (आध्यात्मिक गुरू).
 • १९७३: संदीप खरे (मराठी भाषेतील कवी, गीतलेखक आणि अभिनेते).
 • १९८४: बेनी दयाल (भारतीय गायक).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१३ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६२६: मलिक अंबर (अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण).
 • १९०३: अपोलिनेरियो माबिनी (फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान).
 • १९५०: देवदत्त रामकृष्ण भांडारकर (प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ).
 • १९९६: भाऊराव / मधुकर दत्तात्रेय देवरस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते).
 • २००१: रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी / आर. के. नारायण (भारतीय इंग्रजी लेखक).
 • २०१०: विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी (कवी आणि बालकुमार साहित्यिक).
 • २०१०: डॉ. तारा वनारसे / रिचर्ड्स (मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका).
 • २०१३: जगदीश माळी (भारतीय छायाचित्रकार).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.