२८ मे दिनविशेष

२८ मे दिनविशेष - [28 May in History] दिनांक २८ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
शंतनुराव किर्लोस्कर | Shantanurao Kirloskar

दिनांक २८ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


शंतनुराव किर्लोस्कर - (२८ मे १९०३ - २४ एप्रिल १९९४) आधुनिक उद्योजक संस्कृतीचे प्रवर्तक व किर्लोस्कर उद्योग समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा औद्यागिक विकास साधणारे उद्योगमहर्षी असलेले शंतनुराव किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे चिरंजीव होते.

शेवटचा बदल २७ मे २०२१

जागतिक दिवस
२८ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस


ठळक घटना / घडामोडी
२८ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
 • १५०३: पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलॅंडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.
 • १८३०: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ॲंड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
 • १९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.
 • १९१८: अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
 • १९३६: ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
 • १९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
 • १९३७: नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
 • १९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
 • १९४२: दुसरे महायुद्ध - राइनहार्ड हेड्रिचच्या खूनाचा बदला म्हणून नाझींनी चेकोस्लोव्हेकियात १,८०० व्यक्तींना यमसदनास धाडले.
 • १९५२: ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
 • १९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
 • १९६४: पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना.
 • १९८७: पश्चिम जर्मनीच्या मथायस रस्टने आपले छोटे विमान सोवियेत संघाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात उतरवले.
 • १९९६: भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
 • १९९८: भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
 • १९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२८ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १५२४: सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
 • १७३८: जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.
 • १७५९: छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८८३: विनायक दामोदर सावरकर (हिंदू तत्त्वज्ञ, वक्ते, मराठी कवी / लेखक).
 • १९०३: शंतनुराव किर्लोस्कर (मराठी उद्योगपती, मृत्यू: २४ एप्रिल १९९४).
 • १९०७: दिगंबर विनायक / नानासाहेब पुरोहित (स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक).
 • १९०८: इयान फ्लेमिंग, दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक.
 • १९२१: पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर, शास्त्रीय गायक.
 • १९२३: एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
 • १९४६: के. सच्चिदानंदन, भारतीय कवी आणि समीक्षक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२८ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७८७: लिओपोल्ड मोत्झार्ट (ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक).
 • १९६१: परशुराम कृष्णा गोडे (प्राच्यविद्या संशोधक).
 • १९८२: बळवंत दामोदर / कित्तेवाले निजामपूरकर).
 • १९९४: गणपतराव नलावडे (हिंदूसभेचे नेते व पुण्याचे माजी महापौर).
 • १९९९: बी. विट्टालाचारी (भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.