लवथवती विक्राळा - शंकराची आरती

लवथवती विक्राळा, शंकराची आरती - [Lavthavti Vikrala, Shankarachi Aarti ] लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा.

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझूळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केले ।
त्यामाजी जे अवचित हळाहळ उठिले ॥
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

२ टिप्पण्या

  1. लवथवती असा शब्द आहे. थ चा ध झाला आहे. कृपया सुधारणा करावी ही विनंती.
    1. मनःपूर्वक धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.