विसरून वेदनेला मी आता गात आहे
विसरून वेदनेलामी आता गात आहे
पालखीत स्व स्वरांच्या
मी असा जात आहे
जरासे सोबतीला
सूर घेतो यांतनांचे
आसवास मी माझ्या
मारलेली लाथ आहे
होती जोवरी माया
रमली माणसे भोवताली
अबोल पारिजातकाची
अजून मला साथ आहे
माहित नाही गाव
पूर्वीचे हरवले कुठे
चौकात गल्लीच्या
आज इथे घात आहे
मारण्याला माणसाला
शस्त्र कुठे लागते का
माझ्याच काळजाची
वेदना मला खात आहे