ह्या दिव्याच्या सोबतीला, ही जीवाची वात आहे, अंतरिची वेदना पुन्हा, तेच गीत गात आहे
ह्या दिव्याच्या सोबतीलाही जीवाची वात आहे
अंतरिची वेदना पुन्हा
तेच गीत गात आहे
राहीले कोणत्या दिशेला
स्वप्नातले गाव माझे
मी असा वेडावूनी
सांगा कुठे जात आहे
देऊ नका असा मला
तुम्ही भरवसा
प्रत्येक पावलांच्या चाहूलीला
आज इथे वात आहे
होऊनी बेघर सारे
शब्द पसरले गावातले
बोलणारी वाट त्याची
काळजाच्या आत आहे
नाईलाजाच्या गळ्यात लोंबती
आडचणीचे फास सदा
मजबूर माणसाची
ही कुठली जात आहे