जिकडे जावे तिकडे - मराठी कविता

जिकडे जावे तिकडे, मराठी कविता - [Jikade Jave Tikade, Marathi Kavit] जिकडे जावे तिकडे, सारा बाजार असे भरलेला, माणूस विकतो माणूसकीला, भाव असे ठरलेला.

जिकडे जावे तिकडे, सारा बाजार असे भरलेला, माणूस विकतो माणूसकीला, भाव असे ठरलेला

जिकडे जावे तिकडे
सारा बाजार असे भरलेला
माणूस विकतो माणूसकीला
भाव असे ठरलेला

पेटलेल्या गावातून
पाहणारांची गर्दी दाटे
पुढे होऊन विझविण्यासाठी
कुणी नसे उरलेला

नादात भांडणाच्या
रक्त सांडले चोहीकडे
सोडविणारा कोण आहे
हात त्याचा धरलेला

सारीकडे भ्रष्टाचार
अनागोंदीस पूर येतो
पावलो पावली नीत्तिमतेला
जो तो विसरलेला

बोलतो कोण ऐकतो कोण
ईशाऱ्यातील भाषा सारी
खून, दरोडे, चोऱ्या मारून
कुणी असे पुरलेला

भेटलेला कोण कसा
ओळखायला शिकू या
जीवन सारे अवघड झाले
हाच मार्ग असे उरलेला
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.