आरती अनंतभुजा - विठ्ठलाची आरती

आरती अनंतभुजा, विठ्ठलाची आरती - [Aarti Anantbhuja Viththalachi Aarti] आरती अनंतभुजा, विठो पंढरीराजा, न चालती उपचार, मने सारिली पूजा.

आरती अनंतभुजा, विठो पंढरीराजा, न चालती उपचार, मने सारिली पूजा

आरती अनंतभुजा ॥
विठो पंढरीराजा ॥
न चालती उपचार ॥
मने सारिली पूजा ॥ आरती० ॥ ध्रु० ॥

परेस पार नाही ॥
न पडे निगमा ठायी ॥
भुलला भक्तीभावे ॥
लाहो घेतला देही ॥ आरती० ॥ १ ॥

अनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥
उभा राहिला नीट ॥
रामा जनार्दनी ॥
पायी जोडली वीट ॥ आरती० ॥ २ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.