१२ जुलै दिनविशेष

१२ जुलै दिनविशेष - [12 July in History] दिनांक १२ जुलै च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१२ जुलै दिनविशेष | 12 July in History

दिनांक १२ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल १ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
१२ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन: किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप.

ठळक घटना / घडामोडी
१२ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ११९१: तिसरी क्रुसेड - दोन वर्षांच्या वेढ्यानंतर एकरचा किल्ला पडला..
 • १५८०: ऑस्ट्रोग बायबलचे प्रकाशन.
 • १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
 • १६९१: ऑघ्रिमची लढाई - इंग्लंडच्या विल्यम दुसर्‍याने स्कॉटलंडच्या जेम्स सातव्याला हरवले.
 • १७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
 • १८१२: १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.
 • १८९२: मॉंट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
 • १९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
 • १९३२: हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला.
 • १९३३: अमेरिकन कॉंग्रेसने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
 • १९३५: प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.
 • १९५०: रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.
 • १९६२: लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.
 • १९६७: नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.
 • १९७५: साओ टोमे व प्रिन्सिपला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
 • १९७९: किरिबाटीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.
 • १९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.
 • १९९३: जपानच्या होक्काइदो द्वीपावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या त्सुनामीने ओकुशिरी द्वीपावर २०२ बळी घेतले.
 • १९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 • १९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
 • १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.
 • २००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.
 • २००४: पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.
 • २००५: आल्बर्ट दुसऱ्याचा मोनॅकोच्या राजेपदी राज्याभिषेक.
 • २०१२: नायजेरियातील ओकोबी शहराजवळ अपघात झालेल्या पेट्रोलवाहू ट्रकचा स्फोट. त्यातून गळत असलेले पेट्रोल गोळा करणारऱ्यांपैकी १२१ व्यक्ती ठार, शेकडो जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
१२ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ख्रिस्त पूर्व १००: ज्यूलियस सीझर (रोमन सम्राट, मृत्यु: १५ मार्च, इ.स.पू. ४४).
 • १८१७: हेन्‍री थोरो (अमेरिकन लेखक व विचारवंत, मृत्यू: ६ मे १८६२).
 • १८५२: हिपोलितो य्रिगोयेन (अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ३ जुलै १९३३).
 • १८५४: जॉर्ज इस्टमन (संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक, मृत्यू: १४ मार्च १९३२).
 • १८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ, मृत्यू: ५ जानेवारी १९४३).
 • १९०९: बिमल रॉय (प्रथितयश दिग्दर्शक, मृत्यू: ८ जानेवारी १९६६).
 • १९१३: मनोहर माळगावकर (इंग्रजी लेखक, मृत्यू: १४ जून २०१०).
 • १९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड ( सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश, मृत्यू: १४ जुलै २००८).
 • १९४७: पूचिया कृष्णमूर्ती (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २८ जानेवारी १९९९).
 • १९६१: शिव राजकुमार (भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते).
 • १९६५: संजय मांजरेकर (भारतीय क्रिकेट खेळाडू.).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१२ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९१०: चार्ल्स रोल्स (रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक, जन्म: २७ ऑगस्ट १८७७).
 • १९४९: डग्लस हाइड (आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष, जन्म: १७ जानेवारी १८६०).
 • १९९९: राजेंद्र कुमार (हिंदी चित्रपट अभिनेते, जन्म: २० जुलै १९२९).
 • २०१२: दारासिंग रंधावा (मुष्टीयोद्धा आणि हिंदी चित्रपट अभिनेते, जन्म: १९ नोव्हेंबर १९२८).
 • २०१३: प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण (हिंदी चित्रपट अभिनेते, जन्म: १२ फेब्रुवारी १९२०).
 • २०१३: अमर बोस (बोस कॉर्पोरेशन चे स्थापक, जन्म: २ नोव्हेंबर १९२९).

दिनविशेष        जुलै महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जुलै महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.