२० जुलै दिनविशेष

२० जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० जुलै चे दिनविशेष.
२० जुलै दिनविशेष | 20 July in History
जागतिक दिवस
२० जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन.
 • स्वातंत्र्य दिन: कोलंबिया.
 • शांती व स्वतंत्रता दिन: उत्तर सायप्रस.
 • मैत्री दिन: आर्जेन्टिना, ब्राझिल.

ठळक घटना / घडामोडी
२० जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४०२: तैमुर लंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
 • १७३८: पिएर गॉतिये दि व्हारेने एत दि ला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.
 • १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
 • १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
 • १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
 • १८६४: अमेरिकन यादवी युद्ध - पीचट्री क्रीकची लढाई.
 • १८७१: ब्रिटीश कोलंबिया कॅनडात सामील झाले.
 • १८८१: अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटिंग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.
 • १९०३: फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
 • १९०७: अमेरिकेत सेलम, मिशिगन येथे रेल्वे अपघात. ३० ठार, ७० जखमी.
 • १९१५: वेल्समध्ये कोळसा खाण कामगारांचा संप मिटला.
 • १९२१: न्यू यॉर्क व सान फ्रांसिस्को दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.
 • १९२२: लीग ऑफ नेशन्सने आफ्रिकेतील टोगोलॅंड फ्रांसला तर टांगानिका युनायटेड किंग्डमला दिले.
 • १९२४: ईराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकन राजदूत रॉबर्ट इम्ब्रीची हत्या, लश्करी कायदा लागू.
 • १९२६: मेथोडिस्ट चर्चने स्त्रीयांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
 • १९२७: मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.
 • १९२९: सोवियेत संघाच्या सैन्याने आमूर नदी ओलांडुन मांचुरियात घुसण्याचा प्रयत्न केला.
 • १९३२: जर्मनीने प्रशियात लश्करी अंमल लागू केला.
 • १९३३: लंडनमध्ये ज्यू व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यास ५,००,००० लोकांची रॅली.
 • १९३३: जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात २०० ज्यू व्यापार्‍यांना अटक करून धिंड काढली गेली.
 • १९३५: रॉयल डच एरलाइन्सचे विमान स्वित्झर्लंडमध्ये कोसळले. १३ ठार.
 • १९३५: लाहोरमध्ये मुस्लिम व शिख धर्मियांमध्ये मारामारी. ११ ठार.
 • १९३७: फ्लोरिडातील टॅलाहासीशहराच्या तुरुंगात असलेल्या दोन श्यामवर्णीय कैद्यांना श्वेतवर्णीय जमावाने पळवून नेले व जाहीर फाशी दिली.
 • १९४०: डेन्मार्क लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
 • १९४४: दुसरे महायुद्ध - ऍडोल्फ हिटलरवर असफल खूनी हल्ला.
 • १९४४: मुंबई शहरात कॉलेराच्या साथीनेच ३४,०० लोक मृत्युमुखी पडल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी मान्य केले.
 • १९४७: म्यानमारमध्ये ऑॅंग सानच्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.
 • १९४७: भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.
 • १९४८: सिंगमन र्‍ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९४९: इस्रायेल व सिरीयामध्ये संधी.
 • १९४९: व्हासिल कोलारोव्ह बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
 • १९५०: बेल्जियमच्या संसदेने राजा लिओपोल्ड तिसर्‍याला अज्ञातवासातून परत बोलावले.
 • १९५०: कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची तात्पुरती राजधानी तैजोन वर हल्ला चढवला.
 • १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला पहिल्याची हत्या.
 • १९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे पंधरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
 • १९५४: व्हियेतनाम युद्ध - जिनिव्हा येथे शस्त्रसंधी. देशाचे १७व्या अक्षांशावर विभाजन.
 • १९५५: चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.
 • १९५८: युगोस्लाव्हियातील कोकिन ब्रेगच्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.
 • १९५९: इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.
 • १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख.
 • १९६०: साएब सालेम लेबेनॉनच्या पंतप्रधानपदी.
 • १९६१: एलियास त्सिरिमोकोस ग्रीसच्या पंतप्रधानपदी.
 • १९६९: अपोलो ११ चंद्रावर उतरले.
 • १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.
 • १९६९: होन्डुरास व एल साल्वाडोरमध्ये शस्त्रसंधी.
 • १९७१: सिरिया व जॉर्डनच्या सैन्यांमध्ये चकमक.
 • १९७२: नेदरलँड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.
 • १९७३: केन्याच्या अर्थमंत्री ज्युलियस कियानोने जाहीर केले की देशातील एशियन लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
 • १९७३: पेलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी जपान एरलाइन्सचे विमान पळवून दुबईला नेले.
 • १९७४: तुर्कस्तानने सायप्रसमध्ये आपले सैनिक उतरवले.
 • १९७५: सरकारी सेंसरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना देशातून हाकलले.
 • १९७६: व्हायकिंग १ हे अंतराळयान मंगळावर उतरले.
 • १९७६: व्हियेतनाम युद्ध - अमेरेकेने थायलंडमधून आपले सैनिक काढून घेतले.
 • १९७७: पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन शहरात पूर. ८० ठार, कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
 • १९७९: डायना न्याड बहामा ते फ्लोरिडा हे ६० मैलांचे अंतर पोहून गेली.
 • १९८२: आयरिश मुक्ती सेनेने लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ८ सैनिक ठार, ४७ जखमी.
 • १९८३: इस्रायेलने बैरुतमधुन आपले सैनिक काढून घेतले.
 • १९८५: अरूबाने नेदरलँड्स ॲंटिल्सपासुन विभक्त होण्याचे ठरवले.
 • १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑॅंग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
 • १९९२: वाक्लाव हावेलने चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 • १९९२: टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.
 • १९९६: स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.
 • १९९७: बिल्याना प्लाव्ह्सिकने बॉस्निया व हर्झगोव्हेनाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 • १९९८: तालिबानच्या हुकुमावरुन २०० स्वयंसेवी डॉक्टर व इतर संस्थांनी अफगाणिस्तान सोडले.
 • १९९९: चीनने फालुन गॉंग या संघटनेस दुष्ट संघटना ठरवले व त्यावर बंदी टाकली.
 • २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
 • २००२: पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
 • २००३: केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.
 • २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२० जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ख्रिस्त पूर्व ३५६: अलेक्झांडर द ग्रेट (मॅसेडोनियाचा राजा, मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३).
 • १८२२: ग्रेगोर मेंडेल (जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ, मृत्यू: ६ जानेवारी १८८४).
 • १८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट (ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर, मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५).
 • १८८९: जॉन रीथ (बीबीसी चे सहसंस्थापक, मृत्यू: १६ जून १९७१).
 • १९११: बाका जिलानी (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २ जुलै १९४१).
 • १९१९: सर एडमंड हिलरी (माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक, मृत्यू: ११ जानेवारी २००८).
 • १९२१: पंडित सामताप्रसाद (बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, मृत्यू: ३१ मे १९९४).
 • १९२९: राजेंद्रकुमार (हिंदी चित्रपट अभिनेते, मृत्यू: १२ जुलै १९९९).
 • १९५०: नसीरुद्दीन शाह (हिंदी चित्रपट अभिनेते).
 • १९७६: देबाशिष मोहंती (भारतीय क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२० जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९२२: आंद्रे मार्कोव्ह (रशियन गणितज्ञ, जन्म: १४ जून १८५६).
 • १९३७: गुग्लिएल्मो मार्कोनी (रेडिओचे संशोधक, जन्म: २५ एप्रिल १८७४).
 • १९४३: वामन मल्हार जोशी (कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक, जन्म: २१ जानेवारी १८८२).
 • १९५१: अब्दुल्ला (पहिला) (जॉर्डनचा राजा, जन्म: २ फेब्रुवारी १८८२).
 • १९६५: बटुकेश्वर दत्त (क्रांतिकारक, जन्म: १८ नोव्हेंबर १९१०).
 • १९७२: गीता दत्त (हिंदी चित्रपट अभिनेत्री, जन्म: २३ नोव्हेंबर १९३०).
 • १९७३: ब्रूस ली (अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ, जन्म: २७ नोव्हेंबर १९४०).
 • १९९५: शंकरराव बोडस (शास्त्रीय गायक, जन्म: ४ डिसेंबर १९३५).
 • २०१३: खुर्शिद आलम खान (भारतीय राजकारणी, जन्म: ५ फेब्रुवारी १९१९).
 • २०२०: राम अवधेशसिंग यादव (भारतीय राजकारणी व सुप्रसिद्ध सामाजिक न्याय नेते, जन्म: १ जून १९३७).
 • २०२०: विजय मोहंती (राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओडिया चित्रपट अभिनेते, जन्म: ८ एप्रिल १९५०).
 • २०२०: सलमान मझिरी (भारतीय मुस्लिम विद्वान व सहारनपुरमधील मजहीर उलूमचे कुलगुरू, जन्म: १० ऑक्टोबर १९४६).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जुलै महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.