Loading ...
/* Dont copy */

३१ जुलै दिनविशेष

३१ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३१ जुलै चे दिनविशेष.

३१ जुलै दिनविशेष | 31 July in History

जागतिक दिवस

३१ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • हरी पहलावान: मलेशिया.
  • का हेइ हवाई: हवाई.

ठळक घटना (घडामोडी)

३१ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • ७८१: जपानच्या फुजियामा ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रथम नोंद.
  • १००९: सर्जियस चौथा पोपपदी.
  • १४९८: क्रिस्टोफर कोलंबस त्रिनिदादला पोचला.
  • १६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
  • १६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनले.
  • १७०३: डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुले मारली.
  • १८५६: न्यू झीलंडची राजधानी क्राइस्टचर्चची स्थापना.
  • १९१७: पहिले महायुद्ध - य्प्रेसची तिसरी लढाई.
  • १९३२: जर्मनीतील निवडणुकांत नाझी पार्टीला ३८% मते मिळाली.
  • १९४०: अमेरिकेत कुयाहोगा फॉल्स, ओहायो येथे रेल्वे अपघात. ४३ ठार.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पिएर लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.
  • १९४८: न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.
  • १९५१: जपान एरलाइन्सची स्थापना.
  • १९५४: इटलीच्या अर्दितो देसियोच्या नेतृत्वाखाली गिऱ्यारोहक पथकाचे के-२ शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
  • १९५६: ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
  • १९६४: रेंजर ७ ने अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ट छायाचित्रे काढले.
  • १९७१: अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
  • १९७३: डेल्टा एअरलाइन्सचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
  • १९७५: अमेरिकेतील टीम्स्टर युनियनचा नेता जिमी हॉफा गायब.
  • १९८१: पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू.
  • १९८७: कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान.
  • १९८८: मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
  • १९९२: थाई एअरवेझचे एअरबस ए.३०० प्रकारचे विमान नेपाळची राजधानी काठमांडूजवळ कोसळले. ११३ ठार.

जन्म (वाढदिवस, जयंती)

३१ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १५२७: मॅक्सिमिलियन दुसरा (पवित्र रोमन सम्राट, मृत्यू: १२ ऑक्टोबर १५७६).
  • १७०४: गॅब्रिअल क्रॅमर (स्विस गणिती, मृत्यू: ४ जानेवारी १७५२)
  • १८००: फ्रेडरिक वोहलर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)
  • १८७२: लक्ष्मण रामचंद्र पांगारकर (संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार, मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१).
  • १८८०: प्रेमचंद (भारतीय हिंदी साहित्यिक, मृत्यू: ८ ऑक्टोबर १९३६).
  • १८८६: फ्रेड क्विम्बी (अमेरिकन ऍनिमेशन चित्रपट निर्माते, मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५).
  • १९०२: केशव शंकर पिल्लई (व्यंगचित्रकार आणि लेखक, मृत्यू: २६ डिसेंबर १९८९).
  • १९०७: दामोदर धर्मानंद कोसंबी (प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार, मृत्यू: २९ जून १९६६).
  • १९१२: मिल्टन फ्रिडमन (अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६).
  • १९१८: दादासाहेब वर्णेकर (संस्कृत पंडित, मृत्यू: १० एप्रिल २०००).
  • १९१९: हेमू अधिकारी (भारतीय क्रिकेटपटू, मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३).
  • १९४१: अमरसिंग चौधरी (गुजरातचे मुख्यमंत्री, मृत्यू: १५ ऑगस्ट २००४).
  • १९४२: ऍटलस रामचंद्रन (भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते, मृत्यू: २ ऑक्टोबर २०२२).
  • १९४७: मुमताज (हिंदी चित्रपट अभिनेत्री, हयात).
  • १९५३: जिमी कूक (दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू, हयात).
  • १९५४: मनिवांनान (भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक, मृत्यू: १५ जून २०१३).
  • १९६५: जे. के. रोलिंग (हॅरी पॉटर कादंबरी मालिकेच्या लेखिका, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

३१ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १७५०: जॉन (पाचवे) (पोर्तुगालचे राजे, जन्म: २२ ऑक्टोबर १६८९).
  • १८०५: धीरेन चिन्नामलाई (भारतीय सैनिक, जन्म: १७ एप्रिल १७६५).
  • १८६५: जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे (मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार, जन्म: १० फेब्रुवारी १८०३).
  • १८७५: अँड्र्यू जॉन्सन (अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष, जन्म: २९ डिसेंबर १८०८).
  • १९४०: उधम सिंग (भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, जन्म: २८ डिसेंबर १८९९).
  • १९६८: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर (चित्रकार, संस्कृत पंडित, जन्म: १९ सप्टेंबर १८६७).
  • १९८०: मोहम्मद रफी (भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक, जन्म: २४ डिसेंबर १९२४).
  • २०१४: नबरुण भट्टाचार्य (बंगाली भाषेत लेखन करणारे भारतीय लेखक, जन्म: २३ जून १९४८).

३१ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची