इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १६ नोव्हेंबर चे दिनविशेष
TEXT - TEXT.
शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
१६ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- जागतिक सहनशीलता दिवस
ठळक घटना / घडामोडी
१६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
- १८५२: महात्मा फुले यांचा मेजर कॅंन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
- १८९३: डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
- १९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
- १९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
- १९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
- १९३०: विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
- १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
- १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
- १९९६: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
- १९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.
- १९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
- २०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
- २०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
जन्म / वाढदिवस / जयंती
१६ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ४२: तिबेरियस, रोमन सम्राट.
- १८६२: चार्ल्स टर्नर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९२: गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
- १९२२: जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९६८: एडो ब्रान्डेस, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१६ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १२७२: हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १७९७: फ्रेडरिक विल्यम दुसरा, प्रशियाचा राजा.
- २००६: मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
१६ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |