१४ नोव्हेंबर दिनविशेष - [14 November in History] दिनांक १४ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

दिनांक १४ नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०२२
जागतिक दिवस
१४ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- बालदिन: भारत.
ठळक घटना / घडामोडी
१४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १९१८: चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक झाले.
- १९२२: बी.बी.सी.चे रेडियो प्रसारण सुरू झाले.
- १९४०: दुसरे महायुद्ध - इंग्लंडच्या कोव्हेंट्री शहरावर लुफ्तवाफेने तुफान बॉम्बफेक करून शहर जवळजवळ नष्ट केले.
- १९४१: दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुडीने युनायटेड किंग्डमची एच.एम.एस. आर्क रॉयल ही विमावाहू नौका बुडवली.
- १९६९: अपोलो १२चे प्रक्षेपण.
- १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
- १९७०: सदर्न एरवेझ फ्लाइट ९३२ हे विमान हंटिंग्टन, वेस्ट व्हर्जिनिया शहराजवळ कोसळले. मार्शल युनिव्हर्सिटीच्या फुटबॉल संघासह ७५ ठार.
- १९७१: मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले.
- १९७५: स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.
- १९९१: रॉयल ओक, मिशिगन शहरात कामावरून काढून टाकलेल्या पोस्टमनने चार व्यक्तींना ठार केले व पाच इतरांना जखमी करून आत्महत्या केली.
- १९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- २००१: उत्तरेतील सैन्याने काबूल जिंकले.
- २००२: आर्जेन्टिनाने जागतिक बॅंकेचे ८०.५ कोटी अमेरिकन डॉलरचे देणे परत करण्यास असमर्थता दर्शवली.
- २०१३: सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.
जन्म / वाढदिवस / जयंती
१४ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६५०: विल्यम (तिसरा) (इंग्लंडचा राजा, मृत्यू: ८ मार्च १७०२).
- १७१९: लिओपोल्ड मोत्झार्ट (ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक, मृत्यू: २८ मे १७८७).
- १७६५: रॉबर्ट फुल्टन (वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते, मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५).
- १८६३: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड (अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४).
- १८८९: पंडीत जवाहरलाल नेहरू (भारताचे पहिले पंतप्रधान, मृत्यू: २७ मे १९६४).
- १८९१: बिरबल सहानी (पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष, मृत्यू: १० एप्रिल १९४९).
- १९०४: हेरॉल्ड लारवूड (इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९९५).
- १९१८: रघुवीर मूळगावकर (चित्रकार, मृत्यू: ३० ऑगस्ट १९७६).
- १९१९: अनंत काशिनाथ भालेराव (स्वातंत्र्यसैनिक, लेखक, मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१).
- १९२२: ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली (संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस, मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१६).
- १९२४: रोहिणी भाटे (कथ्थक नर्तिका, मृत्यू: १० ऑक्टोबर २००८).
- १९३५: हुसेन (जॉर्डनचे राजे, मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९).
- १९४७: भारतन (भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक, मृत्यू: ३० जुलै १९९८).
- १९७१: अॅडॅम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज).
- १९७१: विकास खन्ना (भारतीय शेफ आणि लेखक).
- १९७४: हृषिकेश कानिटकर (भारतीय क्रिकेटपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१४ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९१५: बुकर टी. वॉशिंग्टन, (अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ, जन्म: ५ एप्रिल १८५६).
- १९६७: सी. के. नायडू (भारतीय क्रिकेटपटू, जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५).
- १९७१: नारायण हरी आपटे (कादंबरीकार, चित्रपट कथालेखक, जन्म: ११ जुलै १८८९).
- १९७७: अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद (हरेकृष्ण पंथाचे संस्थापक, जन्म: १ सप्टेंबर १८९६).
- १९९३: डॉ. मणिभाई भीमभाई देसाई (स्वातंत्र्यसैनिक, जन्म: २७ एप्रिल १९२०).
- २०००: प्रा. योगेश्वर अभ्यंकर (गीतकार व सर्जनशील कवी, जन्म: ५ नोव्हेंबर १९२९).
- २०१३: सुधीर भट (भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक, जन्म: १९५१).
- २०१३: हरि कृष्ण देवसरे (भारतीय पत्रकार आणि लेखक, जन्म: ९ मार्च १९३८).
- २०१५: के.ए. गोपालकृष्णन (भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक, जन्म: १९२९).
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / नोव्हेंबर दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय