१५ नोव्हेंबर दिनविशेष - [15 November in History] दिनांक १५ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

दिनांक १५ नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
आचार्य विनोबा भावे - (११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२).
शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०२२
जागतिक दिवस
१५ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- प्रजासत्ताक दिन: ब्राझिल.
- शिचि-गो-सान: जपान.
ठळक घटना / घडामोडी
१५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १५३३: फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनार्यावर उतरला.
- १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
- १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.
- १९८९: सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
- १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
- २०००: लुआंडाहून निघालेले ए. एन. २४ प्रकारचे विमान कोसळले. ४० ठार.
- २०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
१५ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७३८: विल्यम हर्षेल (जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार, मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२).
- १८७५: बिरसा मुंडा (झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, मृत्यू: ९ जून १९००).
- १८८५: गिजुभाई बधेका (आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते, मृत्यू: २३ जून १९३९).
- १८९१: एर्विन रोमेल (जर्मन सेनापती, मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४४).
- १९०८: कार्लो अबार्थ (अबार्थ कंपनी चे संस्थापक, मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९).
- १९१७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी (संगीतकार, मृत्यू: १९ सप्टेंबर २००७).
- १९१४: व्ही. आर. कृष्णा अय्यर (भारतीय वकील आणि न्यायाधी, मृत्यू: ४ डिसेंबर २०१४).
- १९२७: उस्ताद युनुस हुसेन खाँ (आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक, मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१).
- १९२९: शिरीष पै (मराठी कवी, लेखिका आणि नाटककार, मृत्यू: २ सप्टेंबर २०१७).
- १९३६: तारा सिंग हेर (भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक, मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८).
- १९४८: सुहास शिरवळकर (कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक, मृत्यू: ११ जुलै २००३).
- १९८६: सानिया मिर्झा (लॉन टेनिस खेळाडू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१५ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६३०: योहान केपलर (जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ, जन्म: २७ डिसेंबर १५७१).
- १७०६: दलाई लामा (तिबेटचे ६वे सर्वोच्च धार्मिक नेते, जन्म: १ मार्च १६८३).
- १९४९: नथुराम गोडसे (महात्मा गांधींच्या खुनाच्या कटातील प्रमुख आरोपी, जन्म: ६ ऑक्टोबर १९१०).
- १९४९: नारायण दत्तात्रय आपटे (महात्मा गांधींच्या खुनाच्या कटातील एक आरोपी, जन्म: १९११).
- १९८२: आचार्य विनोबा भावे (भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, जन्म: ११ सप्टेंबर १८९५).
- १९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार (कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, जन्म: ?).
- २०१२: कृष्ण चंद्र पंत (केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, जन्म: १० ऑगस्ट १९३१).
- २०२१: बाबासाहेब पुरंदरे (मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते, जन्म: २९ जुलै १९२२).
- २०२२: शिवा राम कृष्णा घट्टामनेनी (तेलुगु चित्रपट अभिनेते, जन्म: ३१ मे १९४०).
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / नोव्हेंबर दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर