१४ ऑक्टोबर दिनविशेष

१४ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १४ ऑक्टोबर चे दिनविशेष.
१४ ऑक्टोबर दिनविशेष | 14 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १४ ऑक्टोबर चे दिनविशेष


TEXT - TEXT


शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
१४ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • शिक्षक दिन: पोलंड.
 • जागतिक प्रमाण दिन.

ठळक घटना / घडामोडी
१४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १०६६: नॉर्मन दिग्विजय-हेस्टिंग्जची लढाई: इंग्लंडमधील हेस्टिंग्ज गावापासून सात मैलावरच्या सेन्लॅक हिल या टेकडीवर विल्यम द कॉँकररच्या नॉर्मन सैन्याने सॅक्सन सैन्याचा पराभव केला व इंग्लंडच्या राजा हॅरोल्ड दुसर्‍याला मारले.
 • १८८४: जॉर्ज ईस्टमनने छायाचित्र छापायच्या कागदाचा पेटंट घेतला.
 • १९१२: मिलवॉकी, विस्कॉन्सिनमध्ये निवडणूकीसाठी भाषण देणार्‍या थियोडोर रूझवेल्टवर खूनी हल्ला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्टने आपले भाषण पूर्ण केले.
 • १९१३: युनायटेड किंग्डमच्या सेंघेनिड येथील कोळशाच्या खाणीत अपघात. ४३९ ठार.
 • १९३३: जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले.
 • १९४०: दुसरे महायुद्ध- बॅलहॅम ट्यूब दुर्घटना.
 • १९४३: ज्यूंचे शिरकाण- सोबिबोर छळछावणीतील कैद्यांनी उठाव करून ११ वाफेन एस.एस.च्या सैनिकांना मारले व ६०० कैद्यांनी पळ काढला.
 • १९४३: दुसरे महायुद्ध- श्वाईनफर्टवर हल्ला करणार्‍या अमेरिकेच्या बी.१७ फ्लाईंग फोर्ट्रेस प्रकारच्या बॉम्बफेकी विमानांपैकी साठ तोडून पाडली गेली.
 • १९४७: चक यीगरने बेल एक्स-१ प्रकारचे विमान स्वनातीत गतीने उडवले.
 • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवयान स्थापन केला व सपत्निक आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे नवयान बौद्ध धर्मात प्रवेश.
 • १९६८: ऑस्ट्रेलियाच्या मेकरिंग शहरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
 • १९७३: थायलंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन. त्याविरुद्ध गोळीबार करणार्‍या सैनिकांकडून ७७ ठार, ८५७ जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
१४ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १२५७: प्रझेमिसल दुसरा, पोलंडचा राजा.
 • १६३३: जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
 • १६४३: बहादुरशाह पहिला, मोगल सम्राट.
 • १६४४: विल्यम पेन, पेनसिल्व्हेनियाचा स्थापक.
 • १६८७: रॉबर्ट सिम्सन, स्कॉटिश गणितज्ञ.
 • १७१२: जॉर्ज ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १७८४: फर्डिनांड सातवा, स्पेनचा राजा.
 • १८०१: जोसेफ प्लॅटू, बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८८२: चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८८८: कॅथेरिन मॅन्सफील्ड, इंग्लिश लेखक.
 • १८९०: ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८९४: ई.ई. कमिंग्स, अमेरिकन कवी.
 • १९०६: हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
 • १९१४: रेमंड डेव्हिस जुनियर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
 • १९२७: रॉजर मूर, इंग्लिश अभिनेता.
 • १९३०: मोबुटु सेसे सेको, झैरचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३१: निखिल बॅनर्जी, भारतीय शास्त्रीय संगीतकार.
 • १९३२: ऍनातोली लार्किन, रशियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९३९: राल्फ लॉरेन, अमेरिकन फॅशन डिझायनर.
 • १९४०: क्लिफ रिचर्ड, इंग्लिश गायक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१४ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १०६६: हॅरोल्ड गॉडविन्सन, इंग्लंडचा राजा.
 • १०९२: निझाम अल-मुल्क, पर्शियाचा वजीर.
 • १३१८: एडवर्ड ब्रुस, आयर्लंडचा राजा.
 • १६१९: सॅम्युएल डॅनियल, इंग्लिश कवी.
 • १६३७: गॅब्रियेलो चियाब्रेरा, इटालियन कवी.
 • १७०३: थॉमस हॅन्सन किंगो, डेनिश कवी.
 • १७११: ट्यूओफ्लोस, इथियोपियाचा सम्राट.
 • १९४४: एर्विन रोमेल, जर्मन सेनापती.
 • १९५९: एरॉल फ्लिन, ऑस्ट्रेलियन अभिनेता.
 • १९६०: अब्राम इयॉफ, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९७७: बिंग क्रॉस्बी, अमेरिकन गायक व अभिनेता.
 • १९८३: विलार्ड प्राइस, केनेडियन लेखक.
 • १९९७: हॅरोल्ड रॉबिन्स, अमेरिकन लेखक.
 • १९९८: क्लीव्हलँड अमोरी, अमेरिकन लेखक.
 • १९९९: जुलियस न्यरेरे, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.