२७ ऑक्टोबर दिनविशेष

२७ ऑक्टोबर दिनविशेष - [27 October in History] दिनांक २७ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२७ ऑक्टोबर दिनविशेष | 27 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २७ ऑक्टोबर चे दिनविशेष


जलालुद्दीन मुहम्मद अकबर - (१५ ऑक्टोबर १५४२ - २७ ऑक्टोबर १६०५) हे इ. स. १५५६ पासून मृत्यूपर्यंत मुघल सम्राट होते. हे भारताचे तिसरे मुघल सम्राट होते. यांना अकबर-ए-आझम (महान अकबर / अकबर द ग्रेट) असेही संबोधले जाते.

शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
२७ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिवस: तुर्कमेनिस्तान.
 • स्वातंत्र्य दिवस: सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडीन्स.

ठळक घटना / घडामोडी
२७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६८२: फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया शहराची स्थापना.
 • १८१०: अमेरिकेने पश्चिम फ्लोरिडा बळकावले.
 • १८३८: मिसूरीच्या गव्हर्नर लिलबर्न बॉग्सने मॉर्मोन पंथील लोकांना राज्य सोडून जाण्यास फर्मावले. तसे न केल्यास त्यांचे शिरकाण करण्याची धमकी दिली.
 • १९२२: र्‍होडेशियाच्या जनतेने दक्षिण आफ्रिकेत सामील होण्याचे आवाहन धुडकावले.
 • १९२४: उझबेक एस.एस.आर.ची स्थापना.
 • १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झाला पदच्युत केले.
 • १९७१: काँगोच्या लोकतांत्रिक प्रजासत्ताकने आपले नाव बदलून झैर केले.
 • १९७३: कॉलोराडोच्या फ्रिमाँट काउंटीत १.४ कि.ग्रॅ. वजनाची उल्का जमिनीपर्यंत पोचली.
 • १९८६: युनायटेड किंग्डमने आर्थिक बाजारपेठांवरील सगळे निर्बंध काढून घेतले.
 • १९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य.
 • १९९९: हल्लेखोरांनी आर्मेनियाच्या संसदेत गोळ्या चालवून पंतप्रधान वाझगेन सर्गस्यान, संसदाध्यक्ष कारेन डेमिर्च्यान आणि सहा इतर सदस्यांची हत्या केली.
 • २००४: ८६ वर्षांनी बॉस्टन रेड सॉक्सनी वर्ल्ड सिरीझ जिंकली व कर्स ऑफ द बॅम्बिनो ही दंतकथा खोटी ठरवली.

जन्म / वाढदिवस / जयंती
२७ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७२८: जेम्स कूक, ब्रिटीश दर्यासारंग व शोधक.
 • १८११: आयझॅक सिंगर, अमेरिकन संशोधक.
 • १८४४: क्लाउस पॉँटस आर्नोल्डसन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
 • १८५८: थियोडोर रूझवेल्ट, अमेरिकेचा २६वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८७३: एमिली पोस्ट, अमेरिकन लेखिका.
 • १८७७: जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१३: ओटो विक्टरले, झेक रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सचे शोधकर्ते.
 • १९१४: डिलन थॉमस, आयरिश कवी.
 • १९२०: के.आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.
 • १९२३: अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.
 • १९२५: वॉरेन क्रिस्टोफर, अमेरिकन परराष्ट्रसचिव.
 • १९३१: नवल अल-सादवी, इजिप्तचा लेखक.
 • १९३९: जॉन क्लीसी, इंग्लिश अभिनेता.
 • १९४०: जॉन गॉटी, अमेरिकन माफिया.
 • १९४५: लुइस इनासियो लुला दा सिल्वा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६४: मार्क टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९७७: कुमार संघकारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८४: इरफान पठाण, भारताचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२७ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ९३९: एथेलस्टॅन, इंग्लंडचा राजा.
 • १४३९: आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १५०५: इव्हान तिसरा, रशियाचा झार.
 • १६०५: अकबर, मोगल सम्राट.
 • १९८०: जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.