इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २४ ऑक्टोबर चे दिनविशेष
TEXT - TEXT
शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०२१
जागतिक दिवस
२४ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: झाम्बिया.
- संयुक्त राष्ट्र दिन.
ठळक घटना / घडामोडी
२४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १२६०: शार्त्र्सच्या कॅथेड्रलचे उद्घाटन.
- १७९५: रशिया, ऑस्ट्रिया व प्रशियाने पोलिश-लिथुएनियाचे राष्ट्रकुल आपापल्यात वाटून घेतले.
- १८५७: शेफील्ड एफ.सी. या जगातील सर्वप्रथम फुटबॉल क्लबची स्थापना.
- १९१७: ऑक्टोबर क्रांती ची सुरुवात.
- १९३०: ब्राझिलमध्ये राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसाची उचलबांगडी.
- १९३५: इटलीने इथियोपिया वर हल्ला केला.
- १९४४: दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई- जपानची विमानवाहू नौका झुइकाकु आणि युद्धनौका मुसाशीला जलसमाधी.
- १९४५: संयुक्त राष्ट्रांची स्थापना.
- १९६०: नेडेलिन दुर्घटना- बैकानुर कॉस्मोड्रोमवर आर-१६ प्रकारचे क्षेपणास्त्र जमिनीवरच फुटले. फील्ड मार्शल मित्रोफॅन नेडेलिन सह १०० ठार.
- १९६२: भारत-तिबेट सीमा पोलीस दल स्थापना.
- १९६४: उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंग्डमपासून झांबिया या नावाने स्वातंत्र्य.
- १९९८: डीप स्पेस १ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- २००३: काँकोर्डची शेवटची प्रवासी सफर.
जन्म / वाढदिवस / जयंती
२४ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ५१: डोमिशियन, रोमन सम्राट.
- १७६३: डोरोथिया फोन श्लेगेल, जर्मन लेखिका.
- १७८८: सारा हेल, अमेरिकन कवियत्री.
- १८०४: विल्हेल्म एडुआर्ड वेबर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५४: हेंड्रिक विलेम बाख्विस रूझेबूम, डच रसायनशास्त्रज्ञ.
- १८५५: जेम्स एस. शेर्मान, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १८५७: नेड विल्यमसन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १८९१: रफायेल मोलिना-त्रुहियो, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०६: अलेक्झांडर गेलफाँड, रशियन गणितज्ञ.
- १९२०: मार्सेल-पॉल श्युत्झेनबर्गर, फ्रेंच गणितज्ञ.
- १९२३: डेनिस लेव्हेर्तोव्ह, इंग्लिश कवी.
- १९३०: सुलतान अहमद शाह, मलेशियाचा राजा.
- १९३२: पिएर-गिलेस दि जेनेस, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३२: रॉबर्ट मुंडेल, केनेडियन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९८१: मल्लिका शेरावत, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९८५: वेन रूनी, इंग्लिश फुटबॉल खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२४ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ९९६: ह्यु कापे, फ्रांसचा राजा.
- १२६०: सैफ अद-दिन कुतुझ, इजिप्तचा सुलतान.
- १३७५: वाल्देमार चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९४४: लुई रेनॉल्ट, फ्रांसचा कार उद्योजक.
- १९७२: जॅकी रॉबिन्सन, पहिला श्यामवर्णीय अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- २००५: होजे अझ्कोना देल होयो, हॉन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१३: मन्ना डे
दिनविशेष ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |