इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ४ ऑक्टोबर चे दिनविशेष
केशवराव भोसले - (९ ऑगस्ट १८९० - ४ ऑक्टोबर १९२१) मराठी नाट्यसृष्टीतील गायक-अभिनेते होते.
शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०२१
जागतिक दिवस
४ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: लेसोथो.
ठळक घटना / घडामोडी
४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १२०९: पोप इनोसंट तिसर्याने ऑट्टो चौथ्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.
- १५८२: पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगोरीयन दिनदर्शिकेची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार यावर्षी इटली, पोलंड, पोर्तुगाल व स्पेनमध्ये ऑक्टोबर ४ नंतरचा दिवस ऑक्टोबर १५ होता.
- १९१०: पोर्तुगालने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. राजा मनुएल दुसरा पळून युनायटेड किंग्डमला आश्रयास गेला.
- १९१०: बर्म्युडाने आपला नवीन ध्वज अंगिकारला.
- १९५७: सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९९३: मॉस्कोमध्ये लश्कराने संसदेवर रणगाड्यांसह चाल केली.
- २००४: स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.
जन्म / वाढदिवस / जयंती
४ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९१४: म. वा. धोंड, मराठी समीक्षक.
- १९३७: जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
४ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९०४: कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ
- १९२१: केशवराव भोसले, मराठी गायक.
- १९८२: सोपानदेव चौधरी, मराठी कवी.
- १९९३: जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.
- २००२: भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.
दिनविशेष ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |