१२ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १२ ऑक्टोबर चे दिनविशेष.
जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १२ ऑक्टोबरचा इतिहास पहा.
विजयसिंग माधवजी मर्चंट / विजय माधवजी ठाकरसी - (१२ ऑक्टोबर १९११ - २७ ऑक्टोबर १९८७) भारतकडून दहा कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. उजखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या मर्चंट यांनी इ.स. १९२९ ते इ.स. १९५१ दरम्यान मुंबईसाठी प्रथमश्रेणी सामने खेळले.
शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०२३
जागतिक दिवस
१२ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: विषुववृत्तीय गिनी.
- मातृ दिन: मलावी.
- हिस्पॅनिक दिन: स्पेन.
- कोलंबस दिन: अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
- स्थानिक संघर्ष दिन: व्हेनेझुएला.
- बाल दिन: ब्राझिल.
ठळक घटना / घडामोडी
१२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ५३९: महान सायरसच्या सैन्याने बॅबिलॉन जिंकले.
- १२७९: निचिरेनने आपल्या दाइ-गोहोन्झोन या ग्रंथाची रचना केली.
- १४९२: ख्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिकेजवळच्या बहामास द्वीपसमूहात पोचला. त्याला आपण भारतात पोचलो आहोत असे वाटले.
- १६९२: मॅसेच्युसेट्सच्या गव्हर्नर विल्यम फिप्सने खरमरीत पत्र पाठवून सेलमच्या चेटकिणींचे खटले बंद करवले.
- १८१०: ऑक्टोबरफेस्ट- म्युनिकच्या राजघराण्याने आपल्या राजकुमाराच्या लग्नाप्रीत्यर्थ म्युनिकच्या जनतेला बियर पिण्यास मुक्त आमंत्रण दिले. यातून ऑक्टोबरफेस्टची सुरुवात झाली.
- १८२२: पेद्रो पहिला ब्राझीलचा सम्राट झाला.
- १८२३: चार्ल्स मॅकिंटॉशने स्कॉटलँडमध्ये पहिला रेनकोट विकला.
- १८७१: भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. हा कायदा १९४९मध्ये रद्द केला गेला.
- १९०१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्टने राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानाचे नाव एक्झिक्यूटिव्ह मॅन्शन बदलून व्हाईट हाऊस केले.
- १९१५: पहिले महायुद्ध- दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना बेल्जियममधून पळून जाण्यास मदत केल्याबद्दल जर्मनीच्या सैन्याने परिचारिका इडिथ कॅव्हेलला गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
- १९१७: पाशेंडेलेची पहिली लढाई, न्यू झीलँडच्या इतिहासताली सगळ्यात मोठी जीवितहानी.
- १९१८: मिनेसोटात लागलेल्या वणव्यात ४५३ व्यक्ती मृत्युमुखी.
- १९२८: चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बॉस्टनमध्ये सर्वप्रथम कृत्रिम फुफ्फुसाचा उपयोग.
- १९६०: संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्हने टेबलावर जोडा आपटून आपला मुद्दा ठासवला.
- १९६२: अमेरिकेच्या वायव्य भागातील वादळात ४६ ठार, २.३ कोटी अमेरिकन डॉलरचे नुकसान.
- १९६८: विषुववृत्तीय गिनीला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १९७९: द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी हे पुस्तक प्रकाशित.
- १९८३: लॉकहीड कॉर्पोरेशनकडून दोन कोटी अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानच्या पंतप्रधान तनाका काकुऐला चार वर्षांचा कारावास.
- १९८४: प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी या दहशतवादी संघटनेने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर व तिच्या मंत्रीमंडळावर बॉम्बहल्ला केला. पाच ठार, थॅचर बचावली.
- १९८८: जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गिनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
- १९९१: असकार अकायेव किर्गिझस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध नियुक्त.
- १९९७: अल्जीरियामध्ये पोलिस असल्याचे भासवून दहशतवाद्यांनी ४३ व्यक्तींची हत्या केली.
- १९९९: परवेझ मुशर्रफने नवाझ शरीफचे सरकार उलथवून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली.
- २०००: अमेरिकेच्या युद्धनौका यू.एस.एस. कोलवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. १७ अमेरिकन सैनिक ठार, ३९ जखमी.
- २००२: दहशतवाद्यांनी बालीतील दोन बारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. २०२ ठार, ३०० जखमी.
जन्म / वाढदिवस / जयंती
१२ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १००८: गो-इचिजो हा जपानी सम्राट.
- १५३७: एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.
- १७९८: पेद्रो पहिला, ब्राझिलचा सम्राट.
- १८६१: फ्रेडरिक मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६६: रामसे मॅकडॉनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९११: विजय मर्चंट, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२५: गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६: अशोक मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६२: दम्मिका रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१२ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ६३८: पोप ऑनरियस पहिला.
- ६४२: पोप जॉन चौथा.
- १५७६: मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १७३०: फ्रेडरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९६७: राम मनोहर लोहिया, भारतीय नेता.
१२ ऑक्टोबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:
ऑक्टोबर महिन्याचा इतिहास | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे ऑक्टोबर महिन्यातील सर्व इतिहास पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / ऑक्टोबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय