१० ऑक्टोबर दिनविशेष

१० ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १० ऑक्टोबर चे दिनविशेष.
१० ऑक्टोबर दिनविशेष | 10 October in History

दिनांक १० ऑक्टोबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


जगजीतसिंह - (८ फेब्रुवारी १९४१ - १० ऑक्टोबर २०११) हे ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते. पंजाबी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी या भाषांमधून जगजीतसिंह यांनी गायन केले.


जागतिक दिवस
 • दोन-दहा दिन: तैवान.
 • राष्ट्र दिन: फिजी.
 • स्वास्थ्य दिन: जपान.
 • कोरियन कामगार पक्ष स्थापना दिन: उत्तर कोरिया.
ठळक घटना / घडामोडी
 • १९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
 • १९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण.
 • १९२०: कारिंथियाच्या जनतेने कारिंथियाला ऑस्ट्रियाचा प्रांत करण्याचे ठरवले.
 • १९३३: युनायटेड एरलाइन्सचे बोईंग २४७ प्रकारचे विमान घातपातामुळे कोसळले. घातपाताने विमान कोसळण्याची (सिद्ध झालेली) ही प्रथम घटना होती.
 • १९३८: पोर्ट ह्युरोन, मिशिगन व सार्निया, ओंटारियोला जोडणारा ब्लू वॉटर ब्रिज खुला झाला.
 • १९३८: दुसरे महायुद्ध-म्युनिकचा करार- सुडेटेनलँड जर्मनीच्या ताब्यात.
 • १९४४: ज्यूंचे शिरकाण- ८०० जिप्सी बालकांना ऑश्विझ तुरुंगात मारण्यात आले.
 • १९५७: श्वेतवर्णीय नसल्यामुळे घानाच्या अर्थमंत्री कोम्ला अग्बेली ग्ब्डमाहला डेलावेरमधील डोव्हर शहरातल्या रेस्टॉरंटमध्ये मालकाने प्रवेश नाकारला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाईट डी. आयझेनहोवरने याबद्दल ग्ब्डमाहची जाहीर माफी मागितली.
 • १९६३: फ्रांसने आपला बिझर्ते आरमारी तळ ट्युनिसीयाच्या हवाली केला.
 • १९७०: फिजीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९७३: करचुकवेगिरी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो ऍग्न्यूने राजीनामा दिला.
 • १९८६: एल साल्वाडोरची राजधानी सान साल्वाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.५ तीव्रतेचा भूकंप. अंदाजे १,५०० ठार.
 • १९९७: ऑस्ट्राल एरलाइन्सचे डी.सी. ९-३२ प्रकारचे विमान उरुग्वेतील नुएव्हो बर्लिन शहराजवळ कोसळले. ७४ ठार.
जन्म / वाढदिवस
 • १८३०: इसाबेला दुसरी, स्पेनची राणी.
 • १८३७: रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकन सेनाधिकारी.
 • १८६१: फ्रिट्यॉफ नानसेन, नॉर्वेचा शोधक, संशोधक, मुत्सद्दी.
 • १८८४: नेव्हिल नॉक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८८४: चार्ल्स पीयर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १८९५: भक्ती रक्षक श्रीधर देव गोस्वामी महाराज, भारतीय गुरू.
 • १८९५: जॉनी टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९०६: आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
 • १९१९: जेरी गोमेझ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९२२: हॅरी केव्ह, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९२७: क्लेरमॉँट डेपेइझा, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३३: सदाशिव पाटील, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९३६: आर्टी डिक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९४९: लान्स केर्न्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८३: वुसिमुझी सिबंदा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९: जर्मॅनिकस, रोमन सेनापती.
 • ८३३: अल-मामुन, खलिफा.
 • १३५९: ह्यु चौथा, सायप्रसचा राजा.
 • १९१३: कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान.
 • १९१४: चार्ल्स पहिला, रोमेनियाचा राजा.
 • २०००: सिरिमावो भंडारनायके, श्रीलंकेची पंतप्रधान.
 • २००५: मिल्टन ओबोटे, युगांडाचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००६: सरस्वतीबाई राणे, भारतीय मराठी गायिका.
 • २००८: रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
 • २०११: जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.

ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.