दिनांक ८ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
जगजीतसिंह - (८ फेब्रुवारी १९४१ - १० ऑक्टोबर २०११) ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
- १६९२: सेलम, मॅसेच्युसेट्सच्या एक डॉक्टरने जाहीर केले की तीन मुलींच्या अंगात सैतान आहे.
- १८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना.
- १८९९: रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.
- १९२४: अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात विषारी वायुने मृत्युदंड देण्यास सुरू केले.
- १९९४: अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
- २०००: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारीला साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला
जन्म / वाढदिवस
- १८१९: जॉन रस्किन, इंग्लिश लेखक.
- १८४४: गोविंद शंकर बापट, ज्येष्ठ साहित्यिक.
- १८९७: डॉ. झाकीर हुसेन, शिक्षणतज्ञ, भारताचे तिसरे राष्ट्रपती.
- १९३६: मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३९: सुधीर मोघे, गीतकार.
- १९४१: जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
- १९६३: मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
- १९५७: जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९४: गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार.
- १९९५: भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ॲडमिरल.
- १९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |