दिनांक २४ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
ललिता पवार - (१८ एप्रिल १९१६ - २४ फेब्रुवारी १९९८) ललिता पवार एक भारतीय सिने-अभिनेत्री होत्या. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: एस्टोनिया.
- जागतिक मुद्रण दिन.
- केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस.
- क्षयरोग निवारण दिन.
- १६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.
- १८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
- १९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.
- १९३८: दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
- १९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
- १९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
- २००९: केन्द्र सरकारने सेवा कर उत्पादन शुल्कात सवलतीची घोषणा केली.
- २०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
- १६७०: छत्रपती राजारामराजे भोसले, मराठा साम्राज्याचे तृतीय छत्रपती.
- १९२४: तलत महमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा.
- १९३९: जॉय मुखर्जी, चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक.
- १९४२: गायत्री चक्रवर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९४८: जे. जयललिता, तमिळनाडूची मुख्यमंत्री.
- १९५५: स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.
- १९७२: पूजा भट, मॉडेल, फिल्म निर्माती, निर्देशक, अभिनेत्री
- १९३६: लक्ष्मीबाई टिळक, मराठी साहित्यिक.
- १९६७: उस्मान अली, हैदराबादचे शेवटचे निज़ाम
- १९८६: रुक्मिणीदेवी अरुंडेल, भरतनाट्यम नर्तिका.
- १९९८: ललिता पवार, अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या.
- २०११: अनंत पै ऊर्फ अंकल पै, अमर चित्र कथा चे जनक.
- २०१८: श्रीदेवी, भारतीय प्रख्यात चित्रपट अभिनेत्री
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |