दिनांक ६ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
पंडित मोतीलाल नेहरु - (६ मे १८६१ - ६ फेब्रुवारी १९३१) मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकीली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्या बरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली.जागतिक दिवस
- वैतंगी दिन - न्यू झीलंड.
- बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया.
- जम्मू-काश्मीर दिन.
- ३३७: ज्युलियस पहिला पोपपदी.
- १७८८: मॅसेच्युसेट्सने अमेरिकेचे संविधान मान्य केले.
- १८१९: सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.
- १८४०: वैतंगीचा तह. न्यू झीलंड राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.
- १९२२: अकिल रॅट्टी पोप पायस अकरावा झाला.
- १९३२: कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- १९३२: प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
- १९३६: जर्मनीत गार्मिश-पार्टेनकर्केन येथे चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९५१: न्यू जर्सीत वूडब्रिज टाउनशिप येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.
- १९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्यातील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
- १९५९: टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
- १९६८: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९९६: टर्किश एअरलाइन्सचे बोईंग ७५७ जातीचे विमान डॉमिनिकन प्रजासत्ताक जवळ अटलांटिक समुद्रात कोसळले. १८९ ठार.
- २००१: सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
- २००१: पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
- २००३: संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.
- २००४: चेचेन अतिरेक्यांनी रशियात मॉस्कोतील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार.
- १६६५: ॲन, इंग्लंडची राणी.
- १६९५: निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १९१२: ॲव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.
- १९१५: प्रदीप, आधुनिक राष्ट्रकवी.
- १९३१: मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
- १९३९: सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.
- १९७६: ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.
- १९८९: चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यू पत्करणारा शेवटचा माणूस.
- १९९३: आर्थर अॅश, अमेरिकन टेनिसपटू.
- २००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.
- २०२२: लता मंगेशकर (ज्येष्ठ भारतीय गायिका आणि संगीतकार, जन्म: २८ सप्टेंबर १९२९)
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |