Loading ...

लता मंगेशकर (मातीतले कोहिनूर)

लता मंगेशकर (मातीतले कोहिनूर) - भारतीय गायिका आणि संगीतकार गानकोकिळा संगीत सम्राज्ञी लता मंगेशकर [Lata Mangeshkar].

लता मंगेशकर - मातीतले कोहिनूर | Lata Mangeshkar - People

गानकोकिळा, संगीत सम्राज्ञी लता मंगेशकर


लता मंगेशकर (मातीतले कोहिनूर)

(Lata Mangeshkar) पिताश्री ‘दीनानाथ मंगेशकर’ यांच्या कडून तसेच आईच्या आईची आई यांच्या कडून जाणते अजाणतेपणी संगीताचे मिळालेले शिक्षण आणि संगीतमय कुटुंबात जन्म घेतल्यामुळे असेल अगर दैवीशक्ती मुळे जन्मतः च लाभलेला सुरेल आवाज, संगीतमय वातावरणात, बालवयात झालेले संस्कार हेच कारण असेल कि आज ‘लता मंगेशकर’ नावाचे स्वर आपल्याला संगीत जगतात ऐकवितात.



वैभवात जन्मलेल्या लता, मिना, उषा, आशा, हृदयनाथ या भावडांना वडिलांच्या मृत्यूनंतर फार हालाखीचे जीवन जगावे लागले. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ मध्ये फक्त ८० रुपये पगारावर लता दिदींनी काम केले ते फार बालवयात. पुणे ते कोल्हापूर ते मुंबई हा त्यांचा प्रवास फार उंच खडतर वाटेवरचा होता. त्यात त्यांना फार मोठमोठ्या व्यक्तीचा सहवास लाभला असला तरी कित्येक कटू प्रसंगांनाही तोंड द्यावे लागले.

साध्या शांपूवरुन, ‘त्यांनी कधी अशी किंमती वस्तू बघितली तरी होती का?’ असे ऐकावे लागले होते. तुंटपुज्या पगारामुळे त्यांना त्यांच्या लाडक्या भावाच्या हृदयानाथांच्या मांडीवरच्या जखमेवर उपचार सुद्धा करता येत नव्हता पण त्याही परिस्थितीत घाबरुन न जाता त्या मोठ्या ध्येयांने सामोऱ्या जात होत्या.

लहानपणी बक्षिसरुपात मिळालेला ‘दिलरुबा’ तुटला तेव्हा लतादिदी रडू लागल्या त्यावर पंडित दिनानाथांनी त्यांना उपदेश केला कि ‘यश’ असे डोक्यात जाऊ देऊ नये. आणी त्यांनी शेवटपर्यंत ते पाळले. म्हणूनच त्या फक्त गायिकाच राहील्या नाही तर त्यांनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत रसिकांना अनेक संगीत अविष्काराची दालने उघडून दिली. त्यांच्या मातोश्री स्वतः चित्रकार होत्या. आणि त्या स्वतःचे चित्र-अविष्कार लोकांना भेट म्हणून देत असत.

लतादिदिंनी अखंड परिश्रमाने स्वतःच्या कुटुंबाचे नंदनवन केले. आज त्यांच्या याच कष्टाचे फळ म्हणजे संगीत क्षेत्रात सर्वात पहिला मान मिळातो तो मंगेशकर भावडांना. संगीत-कला अविष्कार महान कुटुंब म्हणून त्यांची जी ख्याती आहे त्या मागे ५० वर्षांहून अधिक काळाचा प्रदिर्घ कष्टमय इतिहास आहे. आणि त्याच इतिहासाचे चालते बोलते प्रतिक आहे, ‘गानकोकिळा, संगीत सम्राज्ञी लता मंगेशकर’.

- संगीता अहिरे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची