Loading ...

आश्विनशुद्धपक्षी अंबा: नवरातीची आरती

आश्विनशुद्धपक्षी अंबा, नवरातीची आरती - आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो, प्रतिपदेपासून घटस्थापना (Ashwinshuddhapakshi Amba Navratichi Aarti).

आश्विनशुद्धपक्षी अंबा: नवरातीची आरती

आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो…

आश्विनशुद्धपक्षी अंबा: नवरातीची आरती

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो ॥ प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ॥ मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेउनी हो ॥ ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ॥ १ ॥ उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ॥ उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ ध्रु. ॥ द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ॥ सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥ कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ॥ उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ॥ उदो. ॥ २ ॥ तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ॥ मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ॥ कंठींची पदके कांसे पीतांबर पिवळा हो ॥ अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो. ॥ ३ ॥ चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ॥ उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ॥ पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ॥ भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ॥ उदो. ॥ ४ ॥ पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो ॥ अर्थ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो ॥ रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ॥ आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ॥ उदो. ॥ ५ ॥ षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो ॥ घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ॥ कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो ॥ जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो. ॥ ६ ॥ सप्तमीचे दिवशी सप्तश्रृंगगडावरी हो ॥ तेथे तू नांदसी भोवतीं पुष्पे नानापरी हो ॥ जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ॥ भक्त संकटीपडता झेलुनि घेसी वरचेवरी हो ॥ उदो. ॥ ७ ॥ अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायनी हो ॥ सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ॥ मन माझें मोहिले शरण आलो तुजलागुनी हो ॥ स्तनपान देउनि सुखी केले अंतःकरणी हो ॥ उदो. ॥ ८ ॥ नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो ॥ सप्तशतीजप होमहवने सद्भक्ती करुनी हो ॥ षड्रस‍अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ॥ आचार्यब्राह्मणा तृप्त केले कृपेकरुनी हो ॥ उदो. ॥ ९ ॥ दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ॥ सिंहारूढे दारुण शस्त्रे अंबे त्वा घेउनी हो ॥ शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ॥ विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो । उदो. ॥ १० ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची