ओवाळू आरती मदनगोपाळा - कृष्णाची आरती

ओवाळू आरती मदनगोपाळा, कृष्णाची आरती - [Ovalu Aarti Madangopala Aarti] ओवाळू आरती मदनगोपाळा, श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा.
ओवाळू आरती मदनगोपाळा - कृष्णाची आरती | Ovalu Aarti Madangopala - Krushnachi Aarti

ओवाळू आरती मदनगोपाळा, श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा

ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ ध्रु० ॥

चरणकमल ज्याचे अति सुकुम ।
ध्वजवज्रांकुश चरणी ब्रीदाचा तोडर ॥ ओवाळू० ॥ १ ॥

नाभिकमळी ज्याचे ब्रह्मयाचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ ओवाळू० ॥ २ ॥

मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी ।
वेधले मानस हारपली द्रुष्टी । ओवाळू० ॥ ३ ॥

जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ॥ ओवाळू० ॥ ४ ॥

एका जनार्दनी देखियेले रूप ।
रूप पाहो जाता झाले अवघे तद्रूप ॥ ओवाळू आरती० ॥ ५ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.