अवतार गोकुळी - कृष्णाची आरती

अवतार गोकुळी, कृष्णाची आरती - [Avatar Gokuli, Krushnachi Aarti] अवतार गोकुळी हो, जन तारावयासी, लावण्यरूपडे हो, तेजःपुंजाळ राशी.
अवतार गोकुळी - कृष्णाची आरती | Avatar Gokuli - Krushnachi Aarti

अवतार गोकुळी हो, जन तारावयासी, लावण्यरूपडे हो, तेजःपुंजाळ राशी

अवतार गोकुळी हो, जन तारावयासी ।
लावण्यरूपडे हो, तेजःपुंजाळ राशी ॥
उगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी ।
उत्साह सुरवरा, महाथोर मानसी ॥ १ ॥

जय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता ।
आरती ओवाळीन, तुम्हा देवकीसुता ॥ ध्रु० ॥

कौतुक पहावया, माव ब्रह्मयाने केली ।
वत्सेही चोरुनिया, सत्य लोकासी नेली ॥
गोपाळ, गाई, वत्से दोही ठायी रक्षिली ।
सुखाचा प्रेमसिंधू, अनाथांची माउली ॥ जय० ॥ २ ॥

चारिता गोधले हो, इंद्र कोपला भारी ।
मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी ॥
रक्षिले गोकुळ हो, नखी धरिला गिरी ।
निर्भय लोकपाळ, अवतरले हरी ॥ जय० ॥ ३ ॥

वसुदेव देवकीची, बंद फोडिली शाळ ।
होऊनिया विश्वजनिता, तया पोटिचा बाळ ॥
दैत्य हे त्रासियेले, समूळ कंसासी काळ ।
राज्य दे उग्रसेना, केला मथुरापाळ ॥ जय० ॥ ४ ॥

तारिले भक्तजन, दैत्य सर्व निर्दाळून ।
पांडवा सहकार अडलिया निर्वाणी ॥
गुण मी काय वर्णू, मति केवढी वानू ।
विनवितो दास तुका, ठाव मागे चरणी ॥ जय देवा कृष्णनाथा० ॥ ५ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.