पावला प्रसाद आता - शेजारती

पावला प्रसाद आता, शेजारती - [Pavala Prasad Ata, Shejaarti] पावला प्रसाद आता विठो निजावे, आपला तो श्रम कळो येतसे भावे.

पावला प्रसाद आता विठो निजावे, आपला तो श्रम कळो येतसे भावे

पावला प्रसाद आता विठो निजावे ॥
आपला तो श्रम कळो येतसे भावे ॥ १ ॥

आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ॥
पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥ २ ॥

तुम्हासी जागविले आम्ही आपुलिया चाडा ॥
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥ ३ ॥

तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन ॥
नाही निवडिले आम्हा आपुलिया भिन्न ॥ ४ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.