दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य | Daily Horoscope in Marathi - Dainik Rashi Bhavishya in Marathi
दैनिक राशिभविष्य
दैनिक राशिभविष्य - (Daily Horoscope) आजचे जन्मवेळीच्या चंद्रराशीनुसार १२ राशींचे राशीभविष्य.
मेष राशीचे दैनिक भविष्य

आयती कामे विनासायास होतील असे दिसते. व्यवहारात आज नफा संभवतो.

वृषभ राशीचे दैनिक भविष्य

राजकारणात आर्थिक हानी/तोटा संभवतो. हुज्जतीत वेळ वाया घालवू नका. आर्थिक तोटा थोड्या प्रमाणात भरुन निघेल.

मिथुन राशीचे दैनिक भविष्य

जुने वाद उफाळून येण्याची शक्यता. वास्तुची खरेदी करणार्‍यांस हिरवा कंदील.

कर्क राशीचे दैनिक भविष्य

प्राकृतिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता. नित्य कामाचा व्याप वाढेल. कामात किरकोळ वाटल्या तरी अस्थिरता निर्माण करणार्‍या अडचणी उद्भवतील.

सिंह राशीचे दैनिक भविष्य

खोटे आळ येण्याची शक्यता. वाद टाळा. फसगत संभवते. शालेय विद्यार्थ्यांना सुदिन.

कन्या राशीचे दैनिक भविष्य

नवे प्रश्न उपस्थित होऊन मार्गी लागतील. इतरांशी आज सहमत होणे कठीण. मात्र स्वतंत्र विचारांचा फायदाच होईल.

तुळ राशीचे दैनिक भविष्य

चिंता वाढेल. नवीन उपक्रमांना शुभारंभाची शक्यता आहे. सहकारी तत्त्वावर हाती घेतलेल्या कामांवर घोटाळ्याची मोहोर लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीचे दैनिक भविष्य

दिवस मनोरंजक असेल. ज्ञानाचा उपयोग होईल. माणसे दुखावली जाण्याची शक्यता. सावधान.

धनू राशीचे दैनिक भविष्य

थकबाकी वसुली करा. कोर्टाची कामे टाळा. वादविवाद संभव. शारिरीक ताण जाणवेल.

मकर राशीचे दैनिक भविष्य

इतरांबाबत मनात विचार घोळत राहतील. रोखटोकपणा व फटकळपणाने व्यवहार तुटतील.

कुंभ राशीचे दैनिक भविष्य

मनातील कावे उघड होऊन पितळ बाहेर पडण्याची शक्यता आहे. राजकारण्यांनी सावध असावे.

मीन राशीचे दैनिक भविष्य

शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिंना वरिष्ठांचा कृपाप्रसाद मिळेल असे वाटते. सहकार चालू ठेवा.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा