पुरुषांसाठी मराठी उखाणे

पुरुषांसाठी मराठी उखाणे - [Marathi Ukhane for Male] पतीने पत्नीचे नाव घेण्यासाठी संग्रहित केलेले पारंपारिक मराठी उखाणे.

पतीने पत्नीचे नाव घेण्यासाठी संग्रहित केलेले पारंपारिक मराठी उखाणे

१) काय जादु केली जिंकलं मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली __________ माझ्या मनात.


२) रूप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तरी __________ माझी प्यारी.


३) हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी __________ नाजुक जसे गुलाबाचे फुल.


४) सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करू सुखाचा __________ तु, मी आणि एक मुल.


५) जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी ___________ म्हणजे लाखात एक नार.


६) अस्सल सोने चोविस कॅरट, __________ अन्‌ माझे झाले आज मॅरेज.


७) लग्नाचा वाढदिवस करू साजरा, __________ तुला आणला मोगर्‍याचा गजरा.


८) कोरा कागज काळी आई, __________ ला रोज देवळात जाण्याची घाई.


९) संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, __________ चे नाव घेतो सर्व जण ऐका.


१०) दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी __________ व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.


[next] ११) आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, __________ चं नाव आहे अमृतापेक्षाही गोड.


१२) जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध, __________ च्या सहवासात झालो मी धुंद.


१३) उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवरत्नांचा हार __________ च्या गळात.


१४) प्रसन्न वदनाने आले रविराज, __________ ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.


१५) नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री, __________ आजपासून माझी गृहमंत्री.


१६) सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप, __________ मिळाली आहे मला अनुरूप.


१७) सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, __________ माझी नेहमी घरकामात दंग.


१८) मायामय नगरी, प्रेममय संसार, __________ च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.


१९) जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, __________ च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.


२०) रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, __________ च्या साथीने आदर्श संसार करीन.


[next] २१) जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला __________ प्रेमपुतळी.


२२) जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार __________ सारथी.


२३) हिमालय पर्वतावर शंकर - पार्वतीची जोडी, __________ च्या जीवनात मला आहे गोडी.


२४) चंद्राला पाहून भरती येते सागराला, __________ ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.


२५) निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, __________ चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.


२६) चंद्राचा होता उदय समुद्राला येते भरती, __________ दर्शनाने/स्पर्शाने सारे श्रम हरती.


२७) जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, __________ च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.


२८) पंच पक्वानाच्या ताटात वाढले लाडू पेढे, __________ चे नाव घेताना कशाला हवे आढे वेढे.


२९) उगवला सुर्य मावळला रजनी, __________ चे नाव सदैव माझ्या मनी.


३०) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, __________ बरोबर बांधली जीवनगाठ.


[next] ३१) आई वडील, आऊ बहिणी, जणू गोकुळासारखे घर, __________ च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.


३२) चांदीच्या ताटात, रूपया वाजतो खणखण, __________ चे नाव घेऊन सोडतो आता कंकण.


३३) पुढे जाते वासरू, माहुन चालली गाय, __________ ला आवडते नेहमी दुधावरची साय.


३४) संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, __________ मुळे लागली मला संसाराची गोडी.


३५) देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, __________ माझ्या जीवनाची सारथी.


३६) काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, __________ सोबत जीवनात मला आहे आनंद.


३७) नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, __________ आहे माझे जीवन सर्वस्व.


३८) भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, __________ चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.


३९) बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, __________ चे नाव घेतो लग्नाच्या राती.


४०) आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा मान, __________ चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान.


[next] ४१) देवळाला खरी शोभा कळसाने येते, __________ मुळे माझे गृहसौख्य दुणावते.


४२) देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, __________ शी लग्न करून मनोरथ पुर्ण झाले.


४३) श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, __________ ला सुखात ठेवीन हा माझा पण.


४४) पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, __________ च्या गळ्यात घातला मंगळसुत्राचा हार.


४५) नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, __________ राणी माझा तळहाताचा फोड.


४६) नंदनवनात अमृताचे कलश, __________ आहे माझी खुप सालस.


४७) देवाला भक्त करतो मनोभावे वंदन, __________ मुळे झाले संसाराचे नंदन.


४८) भाजीत भाजी मेथीची, __________ माझी प्रितीची.


४९) दही, चक्का, तुप, __________ आवडते मला खुप.


५०) रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, __________ ला पाहून चंद्र सुर्य हसे.


[next] ५१) पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले, __________ चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.


५२) हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात, __________ च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.


५३) शंकरासारखा पिता अन्‌ पार्वतीसारखी माता, __________ राणी मिळाली स्वर्ग आला हाता.


५४) नभंगणी दिसे शरदाचे चांदणे, __________ चे रूप आहे अत्यंत देखणे.


५५) गंगेची वाळू चाळणीने चाळू, चलचल __________ आपण सारीपाट खेळू.


५६) इंग्लिश भाषेला महत्त्व आले फार, __________ ने माझ्या संसाराला लावला हातभार.


५७) सर्व ऋतुत ऋतु आहे वसंत, __________ केली मी पत्नी म्हणून पसंत.


५८) इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला, __________ नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.


५९) रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, __________ ला पाहून चंद्र सुर्य हसे.


६०) रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा, जीवनाचा खेल समजला, __________ मुळे सारा.


[next] ६१) मुखी असावे प्रेम, हातामध्ये दया, __________ सोबत जडली माझी माया.


६२) लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा, __________ च्या रूपापुढे, अप्सरेचा काय तोरा.


६३) आंबे वनात कोकिळा गाते गोड, __________ आहे माझी तळहाताचा फोड.


६४) गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले, __________ च्या साठी __________ गाव पाहिले.


६५) हिर्‍याचा कंठा मोत्याचा घाट, __________ च्या हौसेसाठी केला सगळा थाट.


६६) रसाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला, __________ च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.


६७) श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी, __________ चे नाव घेण्याची ही पहिलीच संधी.


६८) खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड, __________ च्या रूपात नाही कुठेच खोड.


६९) कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध __________ च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.


७०) पुणं तिथं काय उणं म्हणतात सारी जणं, __________ नं केलं सार्थ माझं जिणं.


[next] ७१) कपाळाचे कुंकू जशी चंद्राची कोर, __________ च्या मदतीवर माझा सगळा जोर.


७२) चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम, माझ्या लाडक्या __________ वर माझे खरे प्रेम.


७३) चंद्र आहे चांदणीचा सांगाती, __________ आहे माझी जीवन साथी.


७४) विज्ञान युगात माणूस करतोय निसर्गावर मात, __________ च्या अर्धांगिनी म्हणून घेतला मी माझ्या हातात हात.


७५) अंगणात होती तुळस, तुळशीला घालत होती __________ पाणी, आधी होती आई बापाची तान्ही आता आहे __________ ची राणी.


७६) तार्‍यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं, __________ ला मी जीवन साथी म्हणून निवडलं.


७७) निसर्गाला नाही आदी नाही अंत, __________ आहे माझ्या मनपसंत.


७८) चित्रकाराने केली फलकावर रंगाची उधळण, __________ चे नाव भासे जणू माणिक मोत्यांची उधळण.


७९) __________ माझे पिता, __________ माझी माता, शुभमुहुर्तावर घरी आणली __________ ही कांता.


८०) सनई आणि चौघडा वाजतो सप्तसुरात, __________ चे नाव घेतो __________ च्या घरात.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

1 टिप्पणी

  1. Chan Ukhane!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.