१ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १ ऑगस्ट चे दिनविशेष.

दिनांक १ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
लोकमान्य टिळक - (२३ जुलै १८५६ - १ ऑगस्ट १९२०) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
शेवटचा बदल १ ऑगस्ट २०२२
जागतिक दिवस
१ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी: भारत.
- सैन्य दिन: ॲंगोला, चीन, लेबेनॉन.
- मुक्ती दिन: त्रिनिदाद व टोबेगो, बार्बेडोस.
- राष्ट्र दिन: बेनिन, स्वित्झर्लंड.
- मातृ-पितृ दिन: कॉंगो.
- उत्सव दिन: निकाराग्वा.
ठळक घटना (घडामोडी)
१ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- ५२७: जस्टीनियन पहिला बायझेन्टाईन सम्राटपदी.
- १२९१ : स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
- १४६१: एडवर्ड चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
- १४९२: ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.
- १४९८: क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
- १६९१: अमेरिकेत पहिले आफ्रिकन गुलाम आणले गेले.
- १६६४: सेंट गॉट्टहार्डची लढाई - ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव.
- १७७४: जोसेफ प्रीस्टली व कार्ल विल्हेमने ऑक्सिजन मूलद्रव्याचा शोध लावला.
- १८००: ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
- १८३१: लंडन ब्रिज वाहतुकीस खुला.
- १८३४: ब्रिटीश साम्राज्याने गुलामगिरीस बंदी असल्याचे जाहीर केले.
- १८३८: त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
- १८७६: कॉलोराडो अमेरिकेचे ३८वे राज्य झाले.
- १८९४: पहिल्या चीन-जपान युद्धास सुरुवात.
- १९०२: अमेरिकेने फ्रांसकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
- १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९२७: चीनी गृहयुद्ध - नान्चांगचा उठाव.
- १९३६: बर्लिनमध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू.
- १९४४: ऍन फ्रॅंकने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली.
- १९४४: पोलंडची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव.
- १९५७: अमेरिका व कॅनडाने उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड (नोरॅड)ची रचना केली.
- १९६०: बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
- १९६६: अमेरिकेच्या ऑस्टिन, टेक्सास शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या मुख्य इमारतीतून चार्ल्स व्हिटमनने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले.
- १९६७: इस्रायेलने पूर्व जेरुसलेम बळकावले.
- १९६८: हसनल बोल्कियाहला ब्रुनेइच्या राजगादीवर राज्याभिषेक.
- १९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
- १९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
- १९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- २००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.
- १९९६: मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
- २००४: पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी.
- २००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ख्रिस्त पूर्व १०: क्लॉडियस (रोमन सम्राट, मृत्यू: १३ ऑक्टोबर इ.स. ५४).
- १७४४: जीन बाप्टिस्टे (लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ, मृत्यू: १८ डिसेंबर १८२९).
- १८३५: पुरुषोत्तम दास टंडन (भारतरत्न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, मृत्यू: १ जुलै १९६२).
- १८९९: कमला नेहरू (जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी, मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६).
- १९१३: भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान (चित्रपट अभिनेते दिग्दर्शक, मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२).
- १९२०: अण्णाभाऊ साठे (लोकशाहीर, मृत्यू: १८ जुलै १९६९).
- १९२४: सर फ्रँक वॉरेल (वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू, मृत्यू: १३ मार्च १९६७).
- १९३२: मीना कुमारी (हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, मृत्यू: ३१ मार्च १९७२).
- १९५२: यजुर्वेन्द्रसिंग (भारतीय क्रिकेट खेळाडू.).
- १९५५: अरूणलाल (भारतीय क्रिकेट खेळाडू).
- १९६१: मायकेल वॅटकिन्सन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
- १९६९: ग्रॅहाम थोर्प (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ११३७: लुई (सहावा) (फ्रान्सचा राजा, जन्म: १ डिसेंबर १०८१).
- १९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक, जन्म: २३ जुलै १८५६).
- १९९९: निरादसी चौधरी (बंगाली साहित्यिक, जन्म: २३ नोव्हेंबर १८९७).
- २००५: फहाद (सौदी अरेबियाचा राजा, जन्म: १६ मार्च १९२१).
- २००८: हरकिशनसिंग सुरजित (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, जन्म: २३ मार्च १९१६).
- २००८: अशोक मंकड (क्रिकेटपटू, जन्म: १२ ऑक्टोबर १९४६).
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय