२० ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० ऑगस्ट चे दिनविशेष.

दिनांक २० ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
नरेंद्र अच्युत दाभोलकर - (१ नोव्हेंबर १९४५ - २० ऑगस्ट २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
जागतिक दिवस
- जागतिक मच्छर दिन
ठळक घटना / घडामोडी
- ६३६: यार्मूकची लढाई. खालिद इब्ल अल-वालिदच्या नेतृत्त्वाखाली अरबांनी सिरिया व पॅलेस्टाइन जिंकले.
- १०००: सेंट स्टीवनने हंगेरीचे राष्ट्र स्थापन केले.
- १६६६: शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
- १७७५: स्पेनने तुसॉन, अॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
- १७९४: अमेरिकेच्या सैन्याने शॉनी, मिंगो, डेलावेर, व्यांडोट, मायामी, ऑटावा, चिप्पेवा आणि पोटावाटोमी जमातींचा पराभव केला.
- १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
- १८६६: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ॲंड्रु जॉन्सनने अमेरिकन यादवी युद्ध अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर केले.
- १८८२: पीटर इलिच त्चैकोव्सकीचे १८१२ ओव्हर्चर हे संगीत पहिल्यांदा मॉस्कोमध्ये वाजवले गेले.
- १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
- १९००: जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
- १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने ब्रसेल्स काबीज केले./li>
- १९२०: नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
- १९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
- १९२६: जपान मध्ये निप्पॉन होसो क्योकैची स्थापना.
- १९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली.
- १९४४: दुसरे महायुद्ध - रोमेनियाची लढाई सुरू..
- १९५३: सोवियेत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.
- १९५५: मोरोक्कोमध्ये ऍटलास पर्वतातून आलेल्या बर्बर सैनिकांनी ७७ फ्रेंच नागरिकांना ठार केले.
- १९६०: सेनेगालने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९६८: २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह सोवियेत संघ व इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियावर चढाई केली.
- १९७५: व्हायकिंग १चे प्रक्षेपण.
- १९७७: व्हॉयेजर १चे प्रक्षेपण..
- १९८६: एडमंड, ओक्लाहोमा येथे पोस्टाच्या कर्मचारी पॅट्रिक शेरिलने आपल्या १४ सहकर्मचार्यांची हत्या करून स्वतःला मारुन घेतले.
- १९८८: इराण-इराक युद्ध - आठ वर्षे चाललेल्या लढायांनंतर युद्धबंदी कायम.
- १९९१: एस्टोनियाने स्वतःला सोवियेत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
- १९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
- १९९७: सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण.
- १९९८: ऑगस्ट ७ रोजी केन्या व टांझानियातील आपल्या वकीलातींवर झालेल्या हल्याचा वचपा म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या इमारतींवर क्रुझ प्रक्षेपणास्त्रांनी हल्ला केला. याच वेळी सुदानमध्येही हल्ला करण्यात आला.
- २००८: स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले.
- २००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
- १७७९: जेकब बर्झेलिअस (स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८).
- १८३३: बेंजामिन हॅरिसन (अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: १३ मार्च १९०१).
- १८९६: गोस्त पाल (भारतीय फुटबॉल खेळाडू, मृत्यू: ८ एप्रिल १९७६).
- १९३७: प्रतिभा रानडे (कथा, कादंबरीकार).
- १९४०: रेक्स सेलर्स (भारतीय - ऑस्ट्रेलियन क्रिकेटर).
- १९४१: स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया (युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष, मृत्यू: ११ मार्च २००६).
- १९४४: राजीव गांधी (भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान, मृत्यू: २१ मे १९९१).
- १९४६: एन.आर. नारायण मुर्ती (इन्फोसिस चे सहसंस्थापक).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
- १९३९: एग्नेस गिबर्ने (भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक, जन्म: १९ नोव्हेंबर १८४५).
- १९८४: रघुवीर भोपळे (सुप्रसिद्ध जादूगार, जन्म: २४ मे १९२४).
- १९८५: हरचंदसिंग लोंगोवाल (अकाली दलाचे अध्यक्ष, जन्म: २ जानेवारी १९३२).
- १९८८: माधव शिंदे (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक, जन्म: ३ ऑक्टोबर १९१७).
- १९९७: प्रागजी डोसा (गुजराथी नाटककार लेखक, जन्म: ७ ऑक्टोबर १९०७).
- १९९१: गोपीनाथ मोहांती (उडिया लेखक, जन्म: २० एप्रिल १९१४).
- २०००: प्राणलाल मेहता (चित्रपट निर्माते).
- २०११: राम शरण शर्मा (भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक, जन्म: २६ नोव्हेंबर १९१९).
- २०१३: डॉ. नरेंद्र दाभोलकर (अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक, जन्म: १ नोव्हेंबर १९४५).
- २०१३: जयंत साळगांवकर (ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक, जन्म: १ फेब्रुवारी १९२९).
- २०१४: बी. के. अय्यंगार (भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते, जन्म: १४ नोव्हेंबर १९१).
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय