२ ऑगस्ट दिनविशेष

२ ऑगस्ट दिनविशेष - [2 March in History] दिनांक २ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२ ऑगस्ट दिनविशेष | 2 August in History

दिनांक २ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल १ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • वायु सेना दिन: रशिया.

ठळक घटना / घडामोडी
२ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
 • १७९०: अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
 • १८६९: जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
 • १८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.
 • १९१६: पहिले महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
 • १९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.
 • १९३४: ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - पॉट्ट्सडॅम परिषदेची सांगता.
 • १९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
 • १९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
 • १९८०: इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
 • १९८५: डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.
 • १९९०: इराकने कुवैतवर आक्रमण केले.
 • १९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.
 • २००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.
 • २००५: एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८२०: जॉन टिंडाल (ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ४ डिसेंबर १८९३).
 • १८३४: फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थोल्डी (स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार, मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४).
 • १८३५: अलीशा ग्रे (वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक, मृत्यू: २१ जानेवारी १९०१).
 • १८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे (भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक, मृत्यू: १६ जून १९४४).
 • १८७६: पिंगाली वेंकय्या (भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९६३).
 • १८७७: रविशंकर शुक्ला (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: ३१ डिसेंबर १९६५).
 • १८९२: जॅक एल. वॉर्नर (वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक, मृत्यू: ९ सप्टेंबर १९७८).
 • १९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे (कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक, मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८).
 • १९१८: दादा जे. पी. वासवानी (आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य, मृत्यु: १२ जुलै २०१८).
 • १९२९: विद्याचरण शुक्ला (भारतीय राजकारणी, मृत्यू: ११ जुन २०१३).
 • १९३२: लमेर हंट (अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक, मृत्यू: १३ डिसेंबर २०१६).
 • १९४१: ज्यूल्स हॉफमन (नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ).
 • १९५८: अर्शद अयुब (भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १५८९: हेन्‍री (तिसरा) (फ्रान्सचा राजा, जन्म: १९ सप्टेंबर १५५१).
 • १९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (टेलिफोन चे संशोधक, जन्म: ३ मार्च १८४७).
 • १९३४: पॉल फॉन हिन्डेनबर्ग (जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष, जन्म: २ ऑक्टोबर १८४७).
 • १९७८: अ‍ॅन्टोनी नोगेस (मोनॅको ग्रांप्री चे स्थापक, जन्म: १३ सप्टेंबर १८९०).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.