१४ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १४ ऑगस्ट चे दिनविशेष.

दिनांक १४ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
खाशाबा जाधव - (१५ जानेवारी १९२६ - १४ ऑगस्ट १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
जागतिक दिवस
१४ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- स्वातंत्र्य दिन: पाकिस्तान.
- ध्वज दिन: पेराग्वे.
ठळक घटना (घडामोडी)
१४ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १०४०: मॅकबेथने स्कॉटलंडचा राजा डंकन पहिल्याची हत्या केली. शेक्सपियरने लिहिलेल्या मॅकबेथ नाटकातील प्रमुख पात्र यावर आधारित आहे.
- १८४०: दुसरे सेमिनोल युद्ध - अमेरिकेतील सेमिनोल जमातीचा पराभव व फ्लोरिडातून ओक्लाहोमा येथे सक्तीचे स्थलांतर.
- १८४८: ओरेगॉनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १९१२: अमेरिकेच्या सैन्याने निकाराग्वावर आक्रमण केले.
- १९२१: तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना.
- १९४५: जपानने दोस्त राष्ट्रांची शरणागतीची कलमे मान्य केली.
- १९४७: पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७१: बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७२: पूर्व जर्मनीचे आय.एल. ६२ प्रकारचे विमान पूर्व बर्लिनच्या विमानतळावर कोसळले. १५६ ठार.
- १९८०: लेक वालेंसाने ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील संप पुकारला.
- १९९४: इलिच रामिरेझ सांचेझ तथा कार्लोस द जॅकल पकडला गेला.
- २००५: हेलियोस एरवेझ फ्लाइट ५२२ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान अथेन्स जवळ कोसळले. १२१ ठार.
- २००६: इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१४ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १२९७: हानाझोनो, जपानी सम्राट.
- १६८८: फ्रेडरिक विल्यम पहिला, रशियाचा राजा.
- १७४०: पोप पायस सातवा.
- १७७१: सर वॉल्टर स्कॉट, इंग्लिश ऐतिहासिक कादंबरीकार.
- १७७७: फ्रांसिस पहिला, सिसिलीचा राजा.
- १८७६: अलेक्झांडर ओब्रेनोविच, सर्बियाचा राजा.
- १८९३: ऑस्कार चार्ल्स स्कॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १८९५: जॅक ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०९: लेन डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९११: वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९२५: जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार.
- १९६२: रमीझ राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६६: सईद आझाद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८: प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७१: प्रमोद विक्रमसिंगे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१४ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ५८२: तिबेरियस दुसरा कॉन्स्टन्टाईन, बायझेन्टाईन सम्राट.
- १४३३: होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४६४: पोप पायस दुसरा.
- १९३८: ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८४: खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
- १९८८: आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.
- २००४: चेस्लॉ मिलॉझ, नोबेल पारितोषिक विजेता पोलिश लेखक.
- २००६: ब्रुनो कर्बी, अमेरिकन अभिनेता.
- २०२२: विनायक मेटे (भारतीय राजकारणी, शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख. मराठा आरक्षण आंदोलनातील नेते, जन्म: ३० जून १९७०)
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर