१२ ऑगस्ट दिनविशेष

१२ ऑगस्ट दिनविशेष - [12 March in History] दिनांक १२ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१२ ऑगस्ट दिनविशेष | 12 August in History

दिनांक १२ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल १० ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
१२ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक हत्ती दिवस
 • आंतरराष्ट्रीय युवा दिवस

ठळक घटना / घडामोडी
१२ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • इ.स.पू. ३०: ऍक्टियमच्या लढाईत मार्क ॲंटोनीची हार झाल्याचे कळल्यावर क्लिओपात्राने आत्महत्या केली.
 • १०९९: पहिली क्रुसेड-ऍस्केलॉनची लढाई - क्रुसेड समाप्त.
 • १२८१: जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.
 • १४८०: ओट्रांटोची लढाई - ८०० ख्रिश्चन युद्धबंद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ऑट्टोमन सैनिकांनी त्यांची हत्या केली.
 • १८३३: शिकागो शहराची स्थापना.
 • १८५१: आयझॅक सिंगरला शिवणयंत्राचा पेटंट प्रदान.
 • १८८३: शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.
 • १८९८: स्पॅनिश-अमेरिकन युद्ध समाप्त.
 • १८९८: हवाईने अमेरिकेचे आधिपत्य स्वीकारले.
 • १९०८: सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
 • १९१४: पहिले महायुद्ध - ग्रेट ब्रिटनने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.
 • १९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
 • १९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी.
 • १९४४: वाफ्फेन एस.एस.च्या सैनिकांनी सांताआना दि स्ताझेमा शहरात ५६० व्यक्तींची हत्या केली.
 • १९४८: लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
 • १९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
 • १९५२: मॉस्कोमध्ये १३ ज्यू कवींची हत्या.
 • १९५३: सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
 • १९६०: नासाच्या पहिल्या संचार उपग्रह इको - १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
 • १९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक खेळातून हकालपट्टी.
 • १९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.
 • १९८१: आय. बी.एम. ने पहिला वैयक्तिक संगणक विकायला काढला.
 • १९८२: मेक्सिकोने दिवाळे काढले.
 • १९८५: जपान एरलाइन्स फ्लाइट १२३ हे विमान माउंट ओगुरावर कोसळले. ५२० ठार.
 • १९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.
 • १९९०: दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.
 • १९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
 • १९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कार जाहीर.
 • २०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.
 • २०००: रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.
 • २००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
 • २००५: श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.
 • २०१०: मुंबई मध्ये मग्रुर् रिक्षा टॅक्सी चालकांना आवर घालण्या साठी जागरुक प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने 'मीटर जॅम' आंदोलन पुकारले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१२ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८०१: जॉन कॅडबरी ( ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक , मृत्यू: १२ मे १८८९).
 • १८६०: क्लारा हिटलर (एडॉल्फ हिटलर यांची आई, मृत्यू: २१ डिसेंबर १९०७).
 • १८८१: सेसिल डी मिल (अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक, मृत्यू: २१ जानेवारी १९५९).
 • १८८७: आयर्विन श्रॉडिंगर (नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ४ जानेवारी १९६१).
 • १८९२: एस. आर. रंगनाथन (भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ, मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२).
 • १९०६: शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात (लेफ्टनंट जनरल, मृत्यू: १० ऑगस्ट १९९२).
 • १९१०: यूसुफ बिन इशक (सिंगापूरचे पहिले अध्यक्ष, मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७०).
 • १९१९: डॉ. विक्रम साराभाई (भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार, मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१).
 • १९२४: मुहम्मद झिया उल हक (पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८).
 • १९२६: बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर (गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार, मृत्यु: १४ ऑगस्ट २०१६).
 • १९४८: फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे (कवी, समीक्षक व अनुवादक).
 • १९५९: प्रवीण ठिपसे (बुद्धीबळपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१२ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९६४: इयान फ्लेमिंग (दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक, जन्म: २८ मे १९०८).
 • १९७३: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर (गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती, जन्म: १२ मार्च १९११).
 • १९८२: हेन्‍री फोंडा (अमेरिकन अभिनेते, जन्म: १६ मे १९०५).
 • २००५: लक्ष्मण कादिरमगार (श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते, जन्म: १२ एप्रिल १९३२).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.