
युरी गागारिन - (९ मार्च १९३४ - २७ मार्च १९६८) हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता. १२ एप्रिल १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.
जागतिक दिवस
१२ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- YEAR: TEXT
ठळक घटना (घडामोडी)
१२ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १६०६: ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकला आपला अधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.
- १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने चार्ल्स्टननजीकच्या फोर्ट सम्टरवर हल्ला केला व युद्धास तोंड फुटले.
- १८६४: अमेरिकन गृहयुद्ध-फोर्ट पिलोची कत्तल - जनरल नेथन बेडफोर्ड फॉरेस्टच्या नेतृत्त्वाखालील दक्षिणेच्या सैन्याने शरण आलेल्या उत्तरेच्या श्यामवर्णीय सैनिकांची कत्तल उडवली.
- १८६५: अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने मोबिल, अलाबामा जिंकले.
- १८७७: युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेचा ट्रान्सव्हाल प्रांत बळकावला.
- १९४५: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमनची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
- १९४६: सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६१: सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
- १९७५: ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नॉम पेन्ह जिंकली.
- १९८०: लायबेरियात लष्करी उठाव. सॅम्युएल डोने राज्यसत्ता हाती घेतली.
- १९८१: स्पेस शटल कोलंबियाचे सर्वप्रथम प्रक्षेपण.
- १९९४: युझनेटवर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
- १९९७: भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
- १९९८: स्लोव्हेनियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.६ तीव्रतेचा भूकंप.
- २००२: व्हेनेझुएलात ह्युगो चावेझविरुद्ध उठाव. पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१२ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ४९९: महावीर, जैन धर्मसंस्थापक.
- १५७७: क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९०२: लुई बील, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- १९८१: तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१२ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- २३८: गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट.
- २३८: गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज.
- ३५२: पोप ज्युलियस पहिला.
- १९४५: फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १९८०: विल्यम आर. टॉल्बर्ट, जुनियर, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण