२१ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २१ एप्रिल चे दिनविशेष.

भारतीदासन - (२९ एप्रिल १८९१ - २१ एप्रिल १९६४) भारतीदासन यांचे मूळ नाव कनकसुब्बरत्नम्. हिंदुधर्मप्रणीत जातिव्यवस्थेविरुद्ध - विशेषतः ब्राह्मण जात विरुद्ध व अंधश्रद्धांविरुद्ध भारतीदासन यांनी जळजळीत शब्दांत काव्यलेखन केले आहे. भारती हे जातीने ब्राह्मण होते, तरीही त्यांना ब्राह्मणांचे वर्तन पसंत नव्हते. त्यांनी आपल्या काव्य रचनेतून जातिव्यवस्थेवर व ब्राह्मणांच्या वर्तनावर कठोर प्रहार तर केलेच, पण ब्राह्मण्याचे प्रतीक असलेले आपले यज्ञोपवीतही फेकून दिले. भारतीदासन यांचे भारती हे म्हणूनच निष्ठास्थान बनले.
जागतिक दिवस
२१ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- स्थापना दिन: रोम.
- तिरादेन्तेस दिन: ब्राझील.
- ग्राउनेशन दिन: रासतफारी.
- सचिव दिन.
- भारतीय नागरी सेवा दिन.
ठळक घटना (घडामोडी)
२१ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- इ.स.पू. ७५३: रोम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.
- १५२६: इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मुघल साम्राज्याची भारतात स्थापना.
- १६५९: शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.
- १७२०: बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.
- १७८२: राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.
- १७९२: ब्राझिलच्या स्वातंत्र्यसेनानी तिरादेन्तेसचा वध.
- १८३६: सान जेसिंटोची लढाई - सॅम ह्युस्टनच्या नेतृत्त्वाखालील टेक्सासच्या सैन्याने मेक्सिकन सैन्याला हरवले.
- १९१८: पहिले महायुद्ध - जर्मनीच्या रेड बेरोन नावाने ओळखला जाणाऱ्या लढाऊ वैमानिक मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा लढाईत अंत.
- १९३०: कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.
- १९३२: नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
- १९४४: फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
- १९६०: ब्राझीलची राजधानी रियो दि जानेरोहून ब्राझीलियाला हलवण्यात आली.
- १९६६: थियोपियाच्या हेल सिलासीचे जमैकात आगमन. रासतफारी पंथातील एक महत्त्वाची घटना.
- १९६७: ग्रीसमध्ये कर्नल जॉर्ज पापादोपोलसने सत्ता बळकावली.
- १९७२: अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
- १९७५: व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष जुआन लॉकचे सैगोनहून पलायन.
- १९८७: श्रीलंकेत कोलंबो येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
- १९८९: चीनची राजधानी बीजिंगच्या त्येनानमेन चौकात १,००,००० विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली.
- १९९२: सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.
- १९९७: भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
- २०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात आणला.
- २००९: हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२१ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८६४: मॅक्स वेबर (जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ, मृत्यू: १४ जून १९२०).
- १९०९: जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर (मराठी चित्रकार, मृत्यू: ४ डिसेंबर १९८१).
- १९३४: डॉ. गुंथर सोन्थायमर (महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक, मृत्यू: २ जून १९९२).
- १९३६: जेम्स डॉब्सन (ख्रिस्ती धर्मप्रसारक, हयात).
- १९४४: ग्विटी नोविन (इराणी - कॅनेडियन चित्रकार, ग्राफिक संकल्पक, हयात).
- १९४५: श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच, हयात).
- १९५०: शिवाजी साटम (भारतीय अभिनेते, हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२१ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १०१३: अलेक्झांडर दुसरे (पोप, जन्म: ??).
- १५०९: सातवा हेन्री (इंग्लंडचे राजे, जन्म: २८ जानेवारी १४५७).
- १९१०: सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन (अमेरिकन लेखक, जन्म: ३० नोव्हेंबर १८३५).
- १९३८: सर मुहम्मद इक्बाल (भारत - पाकिस्तान कवी आणि तत्त्वज्ञ, जन्म: ९ नोव्हेंबर १८७७).
- १९४६: जॉन मायनार्ड केन्स (ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, जन्म: ५ जून १८८३).
- १९५२: सर स्टॅफोर्ड क्रिप्स (इंग्लिश राजकारणी, जन्म: २४ एप्रिल १८८९).
- १९६४: भारतीदासन (द्रविड चळवळीला चालना देणारे तमिळ कवी, जन्म: २९ एप्रिल १८९१).
- १९७३: आर्थर फॅडेन (ऑस्ट्रेलियाचे तेरावे पंतप्रधान, जन्म: १३ एप्रिल १८९४).
- १९८५: टॅंक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स (ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष, जन्म: ४ मार्च १९१०).
- २०१३: शकुंतलादेवी (गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणाऱ्या भारतीय महिला, जन्म: ४ नॊव्हेंबर १९२९).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण
अभिप्राय