१४ मे दिनविशेष

१४ मे दिनविशेष - [14 May in History] दिनांक १४ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
छत्रपती संभाजीराजे भोसले | Chhatrapati Sambhaji Raje Bhosale

दिनांक १४ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


छत्रपती संभाजीराजे भोसले - (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव असलेले संभाजीराजे हे औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारे दुसरे छत्रपती होते.

शेवटचा बदल १३ मे २०२१

जागतिक दिवस
१४ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१४ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १७९६: एडवर्ड जेनर यांनी प्रथमतः देवीची लस टोचली.
 • १९५५: शीत युद्ध - सोवियेत संघ व सात इतर कम्युनिस्ट राष्ट्रांनी वॉर्सोचा तह केला.
 • १९६३: कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
 • १९६५: चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
 • १९७३: अमेरिकेने स्कायलॅब या आपल्या अवकाशातील प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले.
 • १९९७: भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.
 • १९८८: अमेरिकेतील कॅरल्टन गावाजवळ दारु पिउन वाहन चालविणार्‍या चालकाने तरुण मुले असलेल्या बसला धडक दिली. या पेटलेल्या बसमध्ये तब्बल २७ जण ठार झाले होते.

जन्म / वाढदिवस / जयंती
१४ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६५७: छत्रपती संभाजीराजे भोसले (छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती).
 • १९०९: वसंत शिंदे (विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित).
 • १९२३: मृणाल सेन (दिग्दर्शक).
 • १९२६: डॉ. इंदुताई पटवर्धन (आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका).
 • १९८१: प्रणव मिस्त्री (भारतीय संगणक शास्त्रज्ञ).
 • १९८४: मार्क झुकरबर्ग (फेसबुक या समाज माध्यमाचे संस्थापक).
 • १९९८: तरुणी सचदेव (रसना या शितपेयाच्या जाहिरातीतील लोकप्रिय बालकलाकार तरुणी).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१४ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६४३: लुई (१३ वे) (फ्रान्सचे राजे).
 • १९२३: सर नारायण गणेश चंदावरकर (कायदेपंडित, समाजसुधारक).
 • १९६३: डॉ. रघूवीर (भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार).
 • १९७८: जगदीश चंद्र माथूर (नाटककार व लेखक).
 • १९९८: फ्रँक सिनात्रा (हॉलिवूड मधील अभिनेते व गायक).
 • २०१२: तरुणी सचदेव (रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार).
 • २०१३: असगर अली इंजिनिअर (भारतीय लेखक).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.