१५ मे दिनविशेष

१५ मे दिनविशेष - [15 May in History] दिनांक १५ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
खंडेराव दाभाडे | Khanderao Dabhade

दिनांक १५ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


खंडेराव दाभाडे - (१५ मे १६६५ - २७ सप्टेंबर १७२९) मराठा साम्राज्यात ‘खंडेराव दाभाडे’ हे सेनापती होते. खंडेराव दाभाडे यांची समाधी पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथील ‘श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर’ येथे आहे.

शेवटचा बदल १४ मे २०२१

जागतिक दिवस
१५ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • विश्व कुटुंबसंस्था दिन.
 • स्वातंत्र्य दिन: पेराग्वे.
 • सेना दिन: स्लोव्हेकिया.
 • शिक्षक दिन: मेक्सिको, दक्षिण कोरिया.

ठळक घटना / घडामोडी
१५ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १२५२: पोप इनोसंट चौथ्याने पोपचा फतवा काढून ख्रिश्चन धर्म न पाळणार्‍यांचा शारिरीक छळ करण्यास मुभा दिली.
 • १६०२: बार्थोलोम्यु गॉस्नॉल्ड हा केप कॉडला पोचणारा प्रथम युरोपीय झाला.
 • १७१८: जेम्स पकलने मशीन गनचा पेटंट घेतला.
 • १७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
 • १७९५: नेपोलियन बोनापार्टने मिलान जिंकले.
 • १८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
 • १९०५: लास व्हेगास शहराची स्थापना.
 • १९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.
 • १९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
 • १९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
 • १९५७: युनायटेड किंग्डमने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
 • १९५८: सोवियेत संघाने स्पुतनिक ३ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
 • १९६०: सोवियेत संघाने स्पुतनिक ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
 • १९६१: पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.
 • १९७२: अमेरिकेने जपानचे ओकिनावा बेट परत केले.
 • २०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू, काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
१५ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८१७: देवेंद्रनाथ टागोर (बंगाली समाजसुधारक).
 • १८५७: विल्यामिना फ्लेमिंग (स्कॉटिश अंतराळतज्ञ).
 • १८५९: पिएर क्युरी (फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ).
 • १९०३: रा. श्री. जोग (साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत).
 • १९०७: सुखदेव थापर (क्रांतिकारक).
 • १९१४: तेनसिंग नोर्गे (एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणार्‍या एडमंड हिलरी यांचे सहकारी).
 • १९६७: माधुरी दिक्षीत-नेने (भारतीय अभिनेत्री).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१५ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३५०: संत जनाबाई.
 • १७२९: खंडेराव दाभाडे (मराठेशाहीच्या आप्तप्रसंगी पराक्रम गाजवणारे मराठा सेनापती).
 • १९९३: के. एम. करिअप्पा (तंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल).
 • १९९४: ओम अग्रवाल (जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता).
 • १९९४: पी. सरदार (चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू).
 • २००७: जेरी फेलवेल (लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.