दिनांक २७ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
पंडित जवाहरलाल नेहरू - (१४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४).
शेवटचा बदल २७ मे २०२१
जागतिक दिवस
२७ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- मातृ दिन: बॉलिव्हिया.
- बाल दिन: नायजेरिया.
ठळक घटना / घडामोडी
२७ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १७०३: झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली.
- १८१३: १८१२चे युद्ध - अमेरिकेच्या सैन्याने फोर्ट जॉर्ज किल्ला जिंकला.
- १८८३: अलेक्झांडर तिसरा, रशियाच्या झारपदी.
- १९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
- १९०७: सान फ्रांसिस्को मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव.
- १९२७: फोर्ड मोटर कंपनीने मॉडेल टी कारचे उत्पादन बंद केले व मॉडेल ए तयार करणे सुरू केले.
- १९३०: न्यू यॉर्कमध्ये क्रायस्लर बिल्डिंग या ३१९ मीटर (१,०४६ फूट) उंचीची त्या काळची सगळ्यात उंच इमारतीचे उद्घाटन.
- १९३३: न्यू डील - यु.एस. फेडरल सिक्युरिटीझ ऍक्ट हा कायदा लागू झाला. अमेरिकेतील सगळ्या कंपन्यांना फेडरल ट्रेड कमिशनकडे आपल्या समभागांची नोंदणी करणे सक्तीचे झाले.
- १९३७: सान फ्रांसिस्को व मरीन काउंटीला जोडणारा गोल्डन गेट ब्रिज हा पूल पादचार्यांना खुला झाला.
- १९३९: डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
- १९४१: दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रूझवेल्टने आणीबाणी जाहीर केली.
- १९५८: एफ.४ फॅंटम या विमानाचे प्रथम उड्डाण.
- १९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
- १९६७: ऑस्ट्रेलियाने स्थानिक ऍबोरिजिन लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
- १९९५: सुपरमॅनची भूमिका करणारा क्रिस्टोफर रीव कलपेपर, व्हर्जिनिया येथे घोडेसवारी करताना पडला व गळ्याखालील स्नायू वापरण्याची शक्ती गमावून बसला.
- १९९८: ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
- १९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
- १९९९: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवो मध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.
- २०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
जन्म / वाढदिवस / जयंती
२७ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९१३: कृष्णदेव मुळगुंद (चित्रकार व नृत्यदिग्दर्शक).
- १९२३: हेन्री किसिंजर (अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते).
- १९३८: डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे (कादंबरीकार).
- १९५७: नितीन गडकरी (भारतीय वकील आणि राजकारणी).
- १९६२: रवी शास्त्री (भारतीय क्रिकेटर).
- १९७५: मायकेल हसी (ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू).
- १९७७: महेला जयवर्धने (श्रीलंकेचा क्रिकेटपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२७ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९१०: रॉबर्ट कोच (नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर).
- १९१९: कंधुकुरी वीरसासिंगम (भारतीय लेखक).
- १९३५: रमाई आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता).
- १९६४: पंडित जवाहरलाल नेहरू (भारताचे पहिले पंतप्रधान).
- १९८६: प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक.
- १९८६: अजय मुखर्जी (भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री).
- १९९४: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक).
- १९९८: मिनोचर रुस्तुम / मिनू मसानी (अर्थतज्ञ).
- २००७: एड यॉस्ट (हॉट एअर बलून चे निर्माते).
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |