दिनांक २१ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
राजीव गांधी - (२० ऑगस्ट १९४४ - २१ मे १९९१) राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि राजीव गांधी यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ पर्यंत राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते.
शेवटचा बदल २० मे २०२१
जागतिक दिवस
२१ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- जागतिक दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस
- आरमार दिन: चिली.
- स्वातंत्र्य दिन: मॉंटेनिग्रो.
ठळक घटना / घडामोडी
२१ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.
- १९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली.
- १९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले.
- १९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
- १९९१: भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.
- १९९२: चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
- १९९४: ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेन यांनी मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहे.
- १९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
२१ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ४२६: प्लेटो (ग्रीक विद्वान).
- १९१६: हेरॉल्ड रॉबिन्स (अमेरिकन कादंबरीकार).
- १९२३: अर्मांड बोरेल (स्विस गणितज्ञ).
- १९२८: ज्ञानेश्वर नाडकर्णी (कला समीक्षक व लेखक).
- १९३१: शरद जोशी (हिंदी कवी, लेखक व उपहासकार).
- १९४४: मेरी रॉबिन्सन (आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्ष).
- १९५६: रविंद्र मंकणी (भारतीय अभिनेते).
- १९५८: नइम खान (भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर).
- १९६०: मोहनलाल (दक्षिण भारतीय अभिनेते).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२१ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ९८७: लुई पाचवा (फ्रांसचे राजे).
- १४८१: क्रिस्चियन पहिला (डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडनचे राजे).
- १६८६: ऑटो व्हॉन गॅरिक (वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक).
- १९७३: बाळकृष्ण ढवळे (मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यवसायिक).
- १९७९: जानकीदेवी बजाज (स्वातंत्र्य वीरांगना).
- १९९१: राजीव गांधी (भारताचे माजी पंतप्रधान).
- १९९८: आबासाहेब बाबूराव किल्लेदार (इंटकचे सोलापुरातील नेते).
- २०००: मार्क आर. ह्यूजेस (हर्बालाइफ कंपनी चे स्थापक).
- २००२: सुलतान अहमद (निर्माते दिग्दर्शक).
- २०२०: छगन चौघुले (लोककलावंत).
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |