२५ मे दिनविशेष

२५ मे दिनविशेष - [25 May in History] दिनांक २५ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
त्र्यंबक शेजवलकर | Tryambak Shejwalkar

दिनांक २५ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


त्र्यंबक शेजवलकर - (२५ मे १८९५ - २८ नोव्हेंबर १९६३) इतिहास संशोधक, लेखक व संपादक असलेल्या त्र्यंबक शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाळातील इतिहासाविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. निजाम आणि पेशवे संबंध, पानिपत (१७६१), श्रीशिवछत्रपती ई. त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. चित्रपट निर्माते श्री. आशुतोष गोवारीकर द्वारे निर्मित ‘पानिपत’ हा चित्रपट त्र्यंबक शेजवलकर लिखित ‘पानिपत’ या ग्रंथावरच आधारीत आहे.

शेवटचा बदल २६ मे २०२१

जागतिक दिवस
२५ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • मे क्रांती दिन आर्जेन्टिना, लिब्या.
 • राष्ट्र दिन जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना.
 • आफ्रिका मुक्ती दिन चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे.
 • मुक्ती दिन लेबेनॉन.
 • युवा दिन युगोस्लाव्हिया.

ठळक घटना / घडामोडी
२५ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४५८: महमुद बेगडा, गुजरातच्या सुलतानपदी आले.
 • १६६६: शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
 • १८९५: फोर्मोसाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
 • १९२६: युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या.
 • १९३५: जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले
 • १९५३: अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली.
 • १९५३: अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून अधिकृत पाने प्रसारण सुरू झाले.
 • १९५५: जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
 • १९६१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने “दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस” पाठवण्याची घोषणा केली.
 • १९६३: इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना.
 • १९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
 • १९८१: सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.
 • १९८५: बांगलादेशमध्ये वादळ. १०,००० हून अधिक ठार.
 • १९९२: विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
 • १९९५: बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले.
 • १९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
 • २००१: कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला.
 • २०११: द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
 • २०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२५ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७१३: जॉन स्टुअर्ट (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान).
 • १८०३: राल्फ वाल्डो एमर्सन (अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी).
 • १८३१: सर जॉन इलियट (ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ).
 • १८८६: रास बिहारी घोष (क्रांतिकारक).
 • १८९५: त्र्यंबक शंकर शेजवलकर (इतिहासकार व लेखक, मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३).
 • १८९९: काझी नझरुल इस्लाम (स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी).
 • १९०७: उ नु (म्यानमारचे राजकारणी).
 • १९२७: रॉबर्ट लुडलुम (अमेरिकन लेखक).
 • १९३६: रुसी सुरती (भारतीय क्रिकेटपटू).
 • १९५४: मुरली (भारतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी).
 • १९७०: मॉरिस क्रॉफ्ट (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९७२: करण जोहर (भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२५ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १२६१: पोप अलेक्झांडर चौथे.
 • १९२४: आशुतोष मुखर्जी (बंगाली शिक्षणतज्ञ).
 • १९५४: गजानन यशवंत ताम्हणे / माणिकराव (आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक).
 • १९९८: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार).
 • १९९९: डॉ. बाळ दत्तात्रय / बी. डी. टिळक (संचालक - पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा).
 • २००१: नीला घाणेकर (गायिका).
 • २००५: सुनील दत्त (भारतीय अभिनेते).
 • २०१३: महेंद्र कर्मा (भारतीय राजकारणी).
 • २०२०: गिरीश साळवी (अभिनेते).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.