१९ मे दिनविशेष

१९ मे दिनविशेष - [19 May in History] दिनांक १९ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
विजय तेंडुलकर | Vijay Tendulkar

दिनांक १९ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


विजय तेंडुलकर - (६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८) प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.

शेवटचा बदल १९ मे २०२१

जागतिक दिवस
१९ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • युवा व क्रीडा दिन: तुर्कस्तान.

ठळक घटना / घडामोडी
१९ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री यांची बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
 • १६०४: कॅनडात मॉन्ट्रिआल शहराची स्थापना.
 • १७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
 • १७४९: इंग्लंडचा राजा जॉर्ज दुसर्‍याने ओहायो कंपनीला अमेरिकेतील ओहायो प्रदेशातील जागा दिली.
 • १८४८: मेक्सिकन-अमेरिकन युद्ध-ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिकोने पराभव मान्य केला व कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटाह ही राज्ये व अ‍ॅरिझोना, कॉलोराडो, वायोमिंग व न्यू मेक्सिको राज्यांचा काही भाग अमेरिकेला १८,२५,००० अमेरिकन डॉलरला विकला.
 • १९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
 • १९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
 • १९२१: अमेरिकन कॉंग्रेसने नागरिकत्त्व याचणार्‍या व्यक्तिंवर देशानुसार आरक्षण सुरू केले.
 • १९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.
 • १९७१: सोवियेत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१९ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८८१: मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष.
 • १८९०: हो ची मिन्ह, व्हिएतनामचे राष्ट्रपती.
 • १९०५: हिराबाई बडोदेकर, भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा.
 • १९०८: माणिक बंदोपाध्याय, भारतीय लेखक, कवी आणि नाटककार.
 • १९१०: नथुराम गोडसे, महात्मा गांधी यांचे मारेकरी.
 • १९१३: नीलम संजीव रेड्डी, भारताचे ६ वे राष्ट्रपती.
 • १९२५: माल्कम एक्स, कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते.
 • १९२६: स्वामी क्रियानंद, आध्यात्मिक गुरू आणि लेखक.
 • १९२८: कोलिन चॅपमन, लोटस कार कंपनी चे स्थापक.
 • १९३४: रस्किन बाँड, भारतीय लेखक आणि कवी.
 • १९३८: गिरीश कर्नाड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक.
 • १९६४: मुरली, तामिळ अभिनेता.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१९ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १२९७: मुक्ताबाई (संत ज्ञानेश्वर यांची बहिण).
 • १९०४: जमशेदजी टाटा (आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक).
 • १९५८: सर जदुनाथ सरकार (भारतीय इतिहासकार).
 • १९६५: तुई मलिला (मालागासी येथील वयोवृद्ध कासव).
 • १९६९: पांडुरंग मार्तंड / आबा चांदोरकर (इतिहास व पुराणसंशोधक).
 • १९९५: पं. विनयचंद्र मौदगल्य (ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ).
 • १९९७: शंभू मित्रा (बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार).
 • १९९९: प्रा. रमेश तेंडुलकर (काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक).
 • २००८: विजय तेंडुलकर (मराठी साहित्यिक, जन्म: ६ जानेवारी १९२८).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.