८ मे दिनविशेष

८ मे दिनविशेष - [8 May in History] दिनांक ८ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
आत्माराम रावजी देशपांडे - कवी अनिल | Atmaram Ravaji Deshpande - Kavi Anil

दिनांक ८ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


आत्माराम रावजी देशपांडे - (११ सप्टेंबर १९०१ - ८ मे १९८२) कवी अनिल या टोपन नावाने लेखन करणारे हे एक मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी होते, मुक्तछंदातील काव्यप्रकाराचे प्रवर्तक असणारे कवी अनिल यांनी दहा पदांची कविता सर्वप्रथम सूरू केली.

शेवटचा बदल ८ मे २०२१

जागतिक दिवस
 • जागतिक रेडक्रॉस दिन.
 • युरोप विजय दिन.
 • जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन.
 • रेड क्रेसेंट दिन.
 • वर्धापनदिन: रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता (१९६२).

ठळक घटना / घडामोडी
 • १५४१: स्पॅनिश शोधक हर्नान्दो दि सोटो मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ पोचला. त्याने या नदीचे नाव रियो दे एस्पिरितु सांतो असे ठेवले.
 • १७९४: फ्रेंच क्रांतीच्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ ऑंत्वान लेवॉइझियेला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा गिलोटिन वर वध केला गेला.
 • १८८६: डॉ. जॉन स्टाइथ पेंबरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
 • १८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावांच्या पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाल्या.
 • १८९९: रॅंड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी.
 • १९०२: मार्टिनिक बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक. सेंट पिएर हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार.
 • १९१२: पॅरामाऊंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
 • १९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
 • १९३३: महात्मा गांधींचे २१ दिवसांचे उपोषण चालू.
 • १९६२: पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे रवींद्र भारती विश्वविद्यालयाची स्थापना.
 • १९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
 • १९७८: रेनहोल्ड मेस्नर व त्याचा सहकारी ऑक्सिजनच्या नळकांड्याविना एव्हरेस्टवर पोहोचले.
 • २०००: लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे.

जन्म / वाढदिवस
 • १८२८: ज्यॉं हेन्री ड्युनांट, रेड क्रॉसचा संस्थापक.
 • १९०६: प्राणनाथ थापर, भारताचे माजी भूसेनाप्रमुख.
 • १९१६: स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
 • १९१६: रामानंद सेनगुप्ता, भारतीय सिनेमॅटोग्राफर.
 • १९२५: गुरुराजा श्यामाचार्य अमूर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक.
 • १९२९: गिरिजा देवी, गायिका.
 • १९७०: मायकेल बेव्हन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू.
 • १९८९: दिनेश पटेल, भारतीय बेसबॉलपटू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १८९९: वासुदेव चाफेकर, भारतीय क्रांतिकारक.
 • १९२०: चिंतामण वैजनाथ राजवाडे पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक.
 • १९५२: विल्यम फॉक्स, फॉक्स थियेटर चे संस्थापक.
 • १९८२: कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे, ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 • १९८४: लिला ॲचेसन वॉलेस, रीडर्स डायजेस्टचे सहसंस्थापक.
 • १९९५: प्रेम भाटिया, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी.
 • १९९५: जि.भी. दीक्षित, देवदेवतांची आणि संतांची चित्रे चितारण्यासाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार.
 • १९९९: श्रीकृष्ण समेळ, कलादिग्दर्शक.
 • २००३: डॉ. अमृत माधव घाटगे, संस्कृत व प्राकृत विद्वान.
 • २००३: विश्वनाथ दिनकर नरवणे, ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार.
 • २०१३: झिया फरिदुद्दीन डागर, धृपद गायक.
 • २०१४: रॉजर एल ईस्टन, जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक.

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.