११ सप्टेंबर दिनविशेष

११ सप्टेंबर दिनविशेष - [11 September in History] दिनांक ११ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
११ सप्टेंबर दिनविशेष | 11 September in History

दिनांक ११ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


विनायक नरहरी भावे /आचार्य विनोबा भावे - (११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२) भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.


जागतिक दिवस
 • राष्ट्र दिन: कॅटेलोनिया.
 • शिक्षक दिन: लॅटिन अमेरिका.
 • राष्ट्रभक्त दिन: अमेरिका.
ठळक घटना / घडामोडी
 • १२९७: स्टर्लिंग ब्रिजची लढाई - विल्यम वॉलेसच्या स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव केला.
 • १६०९: हेन्री हडसन पहिल्यांदा मॅनहॅटनला पोचला.
 • १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय व्हिच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
 • १७९२: होप हिरा चोरला गेला.
 • १९०६: महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
 • १९४१: अमेरिकेने पेंटेगॉन बांधायला सुरुवात केली.
 • १९४२: सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
 • १९४३: दुसरे महायुद्ध:
 • जर्मनीने मिन्स्क आणि लिडामधील ज्यू राहत असलेले भाग रिकामे करवले.
 • १९९७: नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.
 • २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
जन्म / वाढदिवस
 • १८१६: कार्ल झाइस, जर्मन संशोधक.
 • १८८५: डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
 • १८९५: आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.
 • १९०१: कवी अनिल
 • १९८२: श्रिया शरण, तमिळ चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९२१: सुब्रमण्य भारती, तमिळ कवी.
 • १९८७: महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
 • १९९३: अभि भट्टाचार्य, चित्रपटसृष्टीतील अभिनेते
 • १९९८: एन. डी. नगरवाला, क्रीडा संघटक व शिक्षणमहर्षी.
 • २००१: सप्टेंबर ११च्या दहशतवादी हल्ल्यांचे बळी.

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.